Breaking News Latest Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी. दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
Breaking News Latest Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी. दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समर्पण प्रतिष्ठान च्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यामध्ये रिटायर पोलीस कर्मचाऱ्यांनी जसे शिक्षक मतदारसंघासाठी आमदार असतात तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांसाठी सोडविण्यासाठी पोलीस विभागातून सात आमदार देण्यात यावेत आणि 2005 नंतर जॉइनिंग झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या अधिवेशनाच्या वेळी आझाद मैदान येथे आम्ही आंदोलन करणार आहोत असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे
reservation in promotion : सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातींना (ST) पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठे विधान केले. न्यायालयाने एससी-एसटीसाठी आरक्षणाच्या अटी शिथिल करण्यास नकार दिला आणि म्हटले की पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यापूर्वी कर्मचारी संख्यात्मक डेटा गोळा करण्यास बांधील आहेत.
महाराष्ट्र विधानसभेतील बारा भाजप आमदारांचे निलंबन रद्दबातल: सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आमदारांचे निलंबन केवळ एका सत्रासाठी असू शकते. विधानसभा आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करू शकत नाही.
वाचा सविस्तर : http://ठाकरे सरकारला SC चा झटका, BJP च्या 12 आमदारांचे निलंबन ठरवले घटनाबाह्य
Petrol Diesel Prices Today । नवी दिल्ली : केंद्राने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क (Excise Duty Cut) ५ रुपयांनी आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपयांनी कमी केले. त्यानंतर अनेक शहरांमध्ये पेट्रोल १०० रुपयांपर्यंत खाली आलं. यामुळे ४ नोव्हेंबर २०२१ पासून वाहनांच्या इंधनाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. देशात निवडणुकीचे वारे वाहू लागल्यामुळे अनेक दिवसांपासून दर वाढलेले नाही.
वाचा सविस्तर : खुशखबर, अनेक शहरांमध्ये पेट्रोल १०० रुपयांच्या आले खाली
MHADA Exam Latest Update : म्हाडाच्या भरती परीक्षेचं (Mhada Exam)वेळापत्रक (Timetable)पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. 7 फेब्रुवारी पासून सुरु होणा-या परिक्षा आता 31 जानेवापासून ऑनलाईन सुरु होणार आहे. 31 जानेवारी, 2, 3, 7, 8, 9 फेब्रुवारी या सहा दिवसांत परीक्षा घेण्यात येणार आहे. 565 पदांसाठी ऑफलाईन (Offline)होणारी परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे.
वाचा सविस्तर बातमी : MHADA Exam Preponed : म्हाडाच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल
ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्त गडकरी रंगायतन तळमजल्यावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखा कार्यालयाचे उद्घाटन ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार माननीय श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
त्यावेळी खासदार राजन विचारे, महापौर नरेशजी म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, गटनेते दिलीप बारटक्के, नगरसेवक सुधीर कोकाटे, माजी नगरसेवक मनोहर गाढवे तसेच दिग्दर्शक प्रवीण तरडे ,निर्माता अभिनेता मंगेश देसाई, ज्येष्ठ अभिनेते निर्माते प्रसाद कांबळी बरोबर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेचे कार्य कार्य अध्यक्ष विद्याधर ठाणेकर व कार्यवाह नरेंद्र बेडेकर कोषाध्यक्ष आशा जोशी व नाट्य परिषदेचे ठाणे शाखेचे सर्व सभासद उपस्थित होते
- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाल्या स्वाक्षऱ्या
- प्रकल्पाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा
- पहिल्या टप्प्यात किसन नगर क्लस्टरचे काम सुरू
ठाणे : शहरातील बेकायदा धोकादायक इमारतींत जीव मुठीत धरून राहणाऱ्या लाखो ठाणेकरांना हक्काचे आणि सुरक्षित घरकुल देणाऱ्या महत्त्वाकांक्षी क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेने आज महत्त्वाचा टप्पा गाठला.
वागळे इस्टेट येथील क्लस्टर योजनेसाठी अमलबजावणी यंत्रणा असलेली सिडको आणि ठाणे महानगरपालिका यांच्यात आज सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यामुळे क्लस्टरच्या प्रत्यक्ष अमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाण्यातील क्लस्टर योजनेचे शिल्पकार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
तिरुअनंतपुरममध्ये पत्रकारांशी बोलताना केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या की, कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचे जीनोम सिक्वेन्सिंग सातत्याने केले जात आहे. 94 टक्के रुग्णांमध्ये ओमिक्रॉन आणि 6 टक्के रुग्णांमध्ये डेल्टा प्रकार आढळून आला. यासोबतच केरळमधील तिसरी लाट ही 'ओमिक्रॉन वेव्ह' आहे, हे स्पष्ट नाही, असेही त्या म्हणाले.
RRB-NTPC परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटनांनी आज बिहार बंदची हाक दिली. त्याला विरोधी नेत्यांनी पाठिंबा दिला. एआयएसएचे सरचिटणीस आणि आमदार संदीप सौरभ म्हणाले की, आरआरबी-एनटीपीसी परीक्षेतील अनियमिततेच्या चौकशीसाठी रेल्वे मंत्रालयाने स्थापन केलेली समिती हे प्रकरण उत्तर प्रदेशातील निवडणुकांपर्यंत पुढे ढकलण्याचे “षडयंत्र” आहे. ही केंद्र सरकारची फसवणूक असल्याचा दावा त्यांनी केला.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील एका फर्निचर शोरूमला काल रात्री उशिरा भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या आग विझवण्याचे काम करत आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग रात्री 1.40 च्या सुमारास लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.