Breaking News Latest Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी .
Breaking News Latest Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी .
काँग्रेसने कायमच महात्मा गांधींचा वध अश्या शब्दप्रयोगाला आक्षेप घेतला आहे. पण महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीलाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले आहे. नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींचा वध केला असल्याचे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे. कार्यकर्त्यांना संबोधित करतांना नाना पटोले यांनींच महात्मा गांधींचा वध झाला असे शब्द वापरले आहेत.
देशातील 75% पेक्षा जास्त लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. त्याचबरोबर या कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेचे अभिनंदन केले आहे. PM मोदी म्हणाले, 'सर्व प्रौढांपैकी 75% जणांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल आपल्या देशवासीयांचे अभिनंदन. जे लोक आपली लसीकरण मोहीम यशस्वी करत आहेत त्यांचा अभिमान आहे.'
गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त झाल्या आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजेश टोपे यांनी सांगितलं की, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. लता दिदींचे व्हेंटिलेटर काढलं आहे. उपचारांना योग्य प्रतिसाद देत आहेत. । लता मंगेशकर कोरोनामुक्त
देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 281 नवीन रुग्ण आढळले असून 893 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील दैनंदिन सकारात्मकता दर आता 14.50 टक्क्यांवर आला आहे.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. लोणावळा लगतच्या शिलाटने हद्दीत सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. । मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
जम्मू-कश्मीर मध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. सुरक्षादलाने येथे झालेल्या येथील चकमकीत 5 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. सुरक्षादलाने पुलवामा (Pulwama) मध्ये 4 आणि बडगाममध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. । पुलवामा- बडगामध्ये सुरक्षा दलांना मोठं यश