LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Daily News Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी; रोहित पाटलांना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी मिळणार?

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Daily News Update
फोटो सौजन्य:  BCCL
Daily News Update

दहावी-बारावीच्या तोंडी, प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार : वर्षा गायकवाड 

राज्य शिक्षण मंडळाच्या (State Board of Education) दहावीच्या (Class X) लेखी परीक्षा (Written test) या ऑफलाईनच (offline) होतील, त्यात कोणताही तुर्तास बदल होणार नसल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad)  यांनी आज दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षांचा अभ्यास आणि त्याची तयारी करावी असे आवाहनही त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना केले. 
 

Jan 20, 2022  |  09:23 PM (IST)
पंचायत निवडणूक गाजवणाऱ्या रोहित पाटलांना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी मिळणार? रोहित पवारांचे संकेत

अवघ्या 23 वर्षाच्या रोहित पाटील यांनी विरोधकांनाही धोबीपछाड देत कवठे-महाकाळ नगर पंचायत आपल्या ताब्यात मिळवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांना रोहित पाटील यांची ओळख झाली आहे. नगर पंचायतीत केलेल्या कामगिरीमुळे रोहित पाटील यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याचे संकेत आमदार रोहित पवार यांनी आज दिले आहेत.

रोहित पाटीलसारखी मुलं विधानसभेत येणं गरजेचं आहे. त्यांचं वय कमी असेल त्यामुळे गेल्यावेळी त्यांना संधी दिली नसेल. मात्र, वय झालं की पक्ष नक्की विचार करेल, येत्या काळात पक्ष संधी देईल असा मला विश्वास आहे, असे रोहित पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे. 

Jan 20, 2022  |  09:14 PM (IST)
Kishori Pednekar । मुंबई महापौर संतापल्या, भाजपवर पलटवार

Kishori Pednekar । मुंबई महापौर संतापल्या, भाजपवर पलटवार   राणीच्या बागेतील पेंग्वीनचे नाव ऑस्कर ठेवल्यावर आता राज्यात राजकारण रंगत आहे. मराठीचा कळवळा असलेल्या शिवसेनेने पेंग्वीनचे नाव ऑस्कर ठेवल्यावरून भाजपने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना चिमटा काढला. त्यावर लगेच महापौरांना प्रत्युत्तर दिले आहे. 

वाचा सविस्तर : Kishori Pednekar । मुंबई महापौर संतापल्या, भाजपवर पलटवार

Jan 20, 2022  |  09:11 PM (IST)
गोव्यातील ४० पैकी ३४ जागांसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

गोव्यातील ४० पैकी ३४ जागांसाठी भाजपचे उमेदवार जाहीर       गोवा विधानसभेच्या ४० पैकी ३४ जागांसाठीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जाहीर झाले. पक्षाने ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपच्या ३४ उमेदवारांच्या यादीत नऊ अल्पसंख्यांक उमेदवार आहेत.

वाचा अधिक : गोव्यातील ४० पैकी ३४ जागांसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

Jan 20, 2022  |  09:14 PM (IST)
Collages Reopening । शाळांनंतर आता कॉलेजदेखील सुरू होणार

Collages Reopening । शाळांनंतर आता कॉलेजदेखील सुरू होणारआता राज्यातील कॉलेज  कधी सुरू होणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी लवकरच हा निर्णय घेण्यात येईल असे संकेत दिले आहेत.

वाचा सविस्तर : Collages Reopening । शाळांनंतर आता कॉलेजदेखील सुरू होणार

Jan 20, 2022  |  08:30 PM (IST)
टाटांच्या दोन नव्या सीएनजी कार उडवणार धमाल...पाहा खासियत

टाटांच्या दोन नव्या सीएनजी कार उडवणार धमाल...पाहा खासियतCNG Car : टाटा टिअॅगो (Tata Tiago CNG)आणि टाटा टिगोर (Tata Tigor CNG) या दोन नव्या वाहनांसह, टाटा मोटर्सने भारतातील फॅक्टरी-फिटेड सीएनजी पॅसेंजर कारच्या श्रेणीत प्रवेश केला आहे. या श्रेणीत आधाच मारुती सुझुकी आणि ह्युंदाई आधीच त्यांचे संबंधित उत्पादन विकत आहेत. 

वाचा सविस्तर : टाटांच्या दोन नव्या सीएनजी कार उडवणार धमाल...पाहा खासियत

Jan 20, 2022  |  06:40 PM (IST)
चांदी १,६०० रुपयांनी महागली, सोनेही वाढले

Gold Jewellery : डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरल्यामुळे दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी चांदीच्या किमतीत (Silver Price) १,६०३ रुपयांची उसळी दिसून आली, तर स्थानिक बाजारात सोन्याच्या दरात (Gold Price)किंचित वाढ झाली. सोन्याच्या दरात १६ रुपयांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रुपयाच्या कमजोरीमुळे सोन्याच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय परकीय चलन बाजारात सुरुवातीच्या व्यापारात डॉलरच्या तुलनेत रुपया १२ पैशांनी घसरून ७४.७० रुपये झाला.

Jan 20, 2022  |  06:38 PM (IST)
आव्हाडांना रेल्वे रूळाशेजारच्या झोपड्यांची काळजी

रेल्वे रुळालगतच्या (Railway tracks) सर्व झोपड्या(Hut) हटविण्याचा प्रयत्न केला तर लाखो लोकांचे संसार उघड्यावर येतील. त्यामुळे एकही झोपडी मी पाडू देणार नाही.  मी मंत्री नंतर आहे; प्रथम मी लोकांचा कार्यकर्ता आहे. त्या एकाही माणसाला मी घराच्या बाहेर पडू देणार नाही. निवारा हा त्यांचा हक्क आहे. त्यांचा हक्क कोणी हिरावून घेणार असेल तर हिरावणार्‍यांसमोर मी छातीचा कोट करुन उभा राहीन. गरीबाला (Poor) न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड (Housing Minister Dr. Jitendra Awhad) यांनी दिला. 

Jan 20, 2022  |  06:37 PM (IST)
पाच महिलांचा बुडाल्या

गोसेखुर्दच्या बॅक वॉटरमधून नावेतून जात असताना एक मोठी दुर्घटना घडली आहे. ज्यामध्ये ५ महिला पाण्यात बुडाल्या आहेत.

Jan 20, 2022  |  06:35 PM (IST)
अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

 महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी चौदा दिवसांची वाढ करण्यात आली. १०० कोटींच्या मनी लाँड्रिंग अर्थात आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात अनिल देशमुख अटकेत आहेत. विशेष पीएमएलए कोर्टाने अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. यामुळे अनिल देशमुखांचा मुंबईच्या आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. 

Jan 20, 2022  |  02:25 PM (IST)
School Reopen : 24 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरू, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी शाळा सुरू करण्याच्या निर्णयासंदर्भात माहिती दिली.  शाळा सुरू (School Reopen) करण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर द्यावेत, असं सगळ्यांचं मत होतं. कालचं त्यासंदर्भातील फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांना दिली होती. शाळा 24 जानेवारीपासून सुरू करण्याची विनंती त्यांना केली होती. त्यांनी त्या फाईलला मंजुरी दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तेथे 24 जानेवारी पासून शाळा सुरू होतील. 
 

Jan 20, 2022  |  02:15 PM (IST)
Goa Election: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं जाहीर केली यादी, कोणाकोणाला मिळाली उमेदवारी जाणून घ्या
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर (BJP release list of candidates) केली आहे. या यादीत एकूण 34 उमेदवारांची नावे आहेत. गोवा विधानसभेच्या 40 जागांपैकी अद्याप 6 जागांवरील उमेदवारांची भाजपने घोषणा केलेली नाही. दरम्यान भाजपने आज जाहीर केलेल्या यादीत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर याच्या नावाचा समावेश नाही.
Jan 20, 2022  |  01:27 PM (IST)
BrahMos supersonic cruise missile: ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रा यशस्वी चाचणी

ओडिशा : येथील किनारपट्टीवर भारताने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली.

Jan 20, 2022  |  01:22 PM (IST)
Goa Election: भाजपने उत्पल पर्रिकरांची उमेदवारी नाकारली

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर  केली आहे. या यादीत एकूण 34 उमेदवारांची नावे आहेत.  उमेदवारांच्या यादीत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर याच्या नावाचा समावेश होणार असणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र आज जाहीर केलेल्या यादीत उत्पल पर्रिकर यांच्या नावाचा समावेश नाहीये.

Jan 20, 2022  |  11:49 AM (IST)
Maharashtra News Live Update : गडचिरोली जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

जिल्ह्यातील 9 नगरपंचायतीमध्ये मतमोजणी सुरू
अहेरीच्या मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
गडचिरोली हा भाग संवेदनशील असल्याने काही शस्त्रधारी पोलीससुद्धा तैनात
 

Jan 20, 2022  |  11:38 AM (IST)
Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा; लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

मुंबईमध्ये (Mumbai) पसरणाऱ्या कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेमध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनाही कोरोना संसर्ग (Corona infection) झाल्याचे समोर आले होते, त्या ९२ वर्षांच्या आहेत. त्यांना वैद्यकीय देखरेखीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होतं. सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा. 

Jan 20, 2022  |  11:37 AM (IST)
Maharashtra Nagar Panchayat Election Result 2022 : सरकारवर टीका करणाऱ्या पडळकरांना मतदरांनी गप्प केलं

राज्यात झालेल्या नगरपंचायतींच्या (Nagar Panchayat) निवडणुकांचा (Election) निकाल (Result) काल हाती आला. या निकालात महाविकास आघाडीने  (Maha Vikas Aghadi) भाजपाला (BJP) चांगलेच मागे फेकलं आहे. महाविकास आघाडी सरकारनं 62 नगरपंचायतीवर आपला झेंड फडकवला आहे. या निकालावरुन महाविकास आघाडीने टीका करणाऱ्या अनेक भाजपच्या नेत्यांना त्यांचा रस्ता दाखवला आहे. सविस्तर बातमीसाठी येथे  लिंकवर क्लिक करा. 

Jan 20, 2022  |  10:16 AM (IST)
School Reopen: शाळा, महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्यास हिरवा कंदील

राज्यातील कोरोनाची (Corona) तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा (School)- महाविद्यालये (Colleges) सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी याबाबतच्या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला असून स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. 
 

Jan 20, 2022  |  10:15 AM (IST)
Sakri Nagar Panchayat Election Result 2022 : साक्री नगरपंचायत निवडणूक निकालानंतर दोन गटात धुमश्चक्री, मारहाणी

राज्यभरातील नगरपंचायतींचे निकाल काल जाहीर झाले. त्यामध्ये धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायत निवडणूक निकाल जाहीर झाला असून या निकालात भाजपने बाजी मारत 11 जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेनेला 4 जागा व कॉंग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर एक जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर दोन गटात झालेल्या धुमश्चक्रीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.