LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Daily News Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी : २१ जानेवारी २०२२; अमर जवान ज्योत दिल्लीच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Daily News Update Get to know the important events of the day when and where
फोटो सौजन्य:  BCCL
Daily News Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी : २१ जानेवारी २०२२

अमर जवान ज्योत दिल्लीच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन झाली

Jan 21, 2022  |  09:16 PM (IST)
पाकिस्तान पुरस्कृत भारतविरोधी यू ट्युब चॅनल केले ब्लॉक

भारतीय सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तान पुरस्कृत भारतविरोधी यू ट्युब चॅनल ब्लॉक केले. डिसेंबर २०२१ मध्ये २० आणि जानेवारी २०२२ मध्ये ३५ यू ट्युब चॅनल केले ब्लॉक

Jan 21, 2022  |  09:12 PM (IST)
एनसीबी मुंबईने जप्त केले ३.९५० ग्रॅम एफेड्रिन
पुण्याहून मुंबईला आलेल्या आणि विमानाने ऑस्ट्रेलियाला जाणार असलेल्या महिलेने स्वतःच्या कपड्यांमध्ये लपवले होते एफेड्रिन. मुंबईच्या एनसीबी टीमने हे एफेड्रिन जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे.
Jan 21, 2022  |  09:08 PM (IST)
मुंबईच्या हायकोर्टातील न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये साप
मुंबईच्या हायकोर्टातील न्या. बोरकर यांच्या चेंबरमध्ये साप आढळला. सर्पमित्रांना बोलावून साप पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आला.
Jan 21, 2022  |  05:42 PM (IST)
Jan 21, 2022  |  05:31 PM (IST)
अमर जवान ज्योत दिल्लीच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन
अमर जवान ज्योत दिल्लीच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन झाली
Jan 21, 2022  |  05:19 PM (IST)
अमोल कोल्हे यांनी भूमिका साकारलेला सिनेमा निषेधार्ह - जयंत पाटील

Cinema starring NCP MP Amol Kolhe is reprehensible says Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी एका सिनेमात नथुराम गोडसे ही व्यक्तीरेखा साकारली आहे. पण पुरोगामी विचारांचे समर्थन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सिनेमात स्वतःच्याच खासदाराने केलेली भूमिका निषेधार्ह वाटत आहे. 

वाचा : Amol Kolhe's Cinema : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी भूमिका साकारलेला सिनेमा निषेधार्ह - जयंत पाटील

Jan 21, 2022  |  05:18 PM (IST)
सोन्याच्या भावात तेजी, जाणून घ्या सोन्याचा ताजा भाव

Gold Investment : मागील काही महिन्यांपासून चढउतार होत असलेल्या सोन्याच्या भावात (Gold Price) मागील काही दिवसात वाढ झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही (Silver Price) वाढ झाली आहे. या आठवड्याच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी (21 जानेवारी) सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 7416 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता.

वाचा : Gold Price Today | सोन्याच्या भावात तेजी, जाणून घ्या सोन्याचा ताजा भाव

Jan 21, 2022  |  05:24 PM (IST)
केंद्र सरकारने अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला
Jan 21, 2022  |  04:52 PM (IST)
Jan 21, 2022  |  03:21 PM (IST)
मुंबईच्या हायकोर्टातील न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये साप

मुंबईच्या हायकोर्टातील न्या. बोरकर यांच्या चेंबरमध्ये साप आढळला. सर्पमित्रांना बोलावून साप पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आला.

Jan 21, 2022  |  03:16 PM (IST)
EPFO Update | पेन्शनधारकांना मोठा दिलासा!

Pension : ईपीएफओच्या पेन्शनधारकांना (EPDO pensioners) मोठा दिलासा मिळणार आहे. याआधी पेन्शनधारक पेन्शनची (Pension)तारीख निश्चित नसल्यामुळे पेन्शन कधी मिळणार याबद्दल वाट पाहायचे. मात्र आता पेन्शनधारकांना एका निश्चित तारखेला पेन्शन मिळणार आहे. दर महिन्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी पेन्शन जमा केली जाणार आहे. जानेवारी महिन्यापासूनच हा लाभ पेन्शनधारकांना मिळणार आहे.

वाचा : EPFO Update | पेन्शनधारकांना मोठा दिलासा! दर महिन्याच्या निश्चित तारखेला मिळणार पेन्शन

Jan 21, 2022  |  03:14 PM (IST)
मुंबईत १४ तास धावणार नाही ट्रेन, या कारणासाठी मध्य रेल्वेने घेतला निर्णय

मध्य रेल्वेच्या बहुप्रतिक्षित पाचव्या मार्गावर या आठवड्याच्या शेवटी 14 तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेने शनिवारी मध्यरात्रीनंतर ठाणे जिल्ह्यातील ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यानची वाहतूक 14 तासांसाठी बंद ठेवण्याची घोषणा केली आहे

वाचा : कृपया प्रवाशांचे लक्ष असू द्या : मुंबईत १४ तास धावणार नाही ट्रेन, या कारणासाठी मध्य रेल्वेने घेतला निर्णय

Jan 21, 2022  |  03:11 PM (IST)
दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

HSC SSC Exam Dates । महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जारी केलं आहे. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा येत्या 14 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून ती 3 मार्च पर्यंत चालणार आहे. तर दहावीची परीक्षा ही 25 फेब्रुवारी ते 14 मार्चदरम्यान होणार आहे.

वाचा : HSC SSC Practical Exam Date | विद्यार्थ्यांनो लक्ष द्या,  इयत्ता दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Jan 21, 2022  |  03:36 PM (IST)
अमर जवान ज्योत राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीत विलीन होणार
अमर जवान ज्योत राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीत विलीन होणार, आजी-माजी लष्करी अधिकाऱ्यांनी केले निर्णयाचे समर्थन
Jan 21, 2022  |  03:08 PM (IST)
दिल्लीत इंडिया गेटजवळ सुभाषचंद्र बोसांचा पुतळा उभारणार
१२५व्या जयंतीचे औचित्य साधून दिल्लीत इंडिया गेटजवळ भारताच्या लाडक्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ग्रॅनाइटपासून तयार केलेला भव्य पुतळा उभारला जाणार आहे. हा सोहळा २३ जानेवारी २०२२ रोजी होणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
Jan 21, 2022  |  03:08 PM (IST)
भारतात १६० कोटींपेक्षा जास्त लसीकरण

भारतात १ अब्ज ६० कोटी ७७ लाख १४ हजार ६७७ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. देशातील ९२ कोटी ४८ लाख २९ हजार ७४९ जणांना लसचा पहिला डोस तर ६७ कोटी ५९ लाख ३६ हजार १७५ जणांना लसचा दुसरा डोस टोचण्यात आला. भारतातील ६९ लाख ४८ हजार ७५३ जणांना लसचा प्रीकॉशनरी डोस टोचण्यात आला.

Jan 21, 2022  |  03:07 PM (IST)
भारतात २ लाख १८ हजार ७९९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

भारतात २ लाख १८ हजार ७९९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आढळलेल्या ३ कोटी ८५ लाख ६६ हजार २७ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ६० लाख ५८ हजार ८०६ बरे झाले. कोरोनामुळे देशात ४ लाख ८८ हजार ४२२ मृत्यू.