Gujarat Assembly Election Result live in marathi: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली होती. पहिल्या टप्प्यातील मतदान 1 आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 डिसेंबर रोजी झालं. यानंतर आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गुजरात विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत आणि बहुमतासाठी 92 जागांची आवश्यकता आहे. पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. दोन्ही टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पार पडल्यावर विविध चॅनल्स आणि एजन्सीने केलेले एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली होती. या आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मतमोजणीला सुरुवात झाल्यावर आता भाजपने रेकॉर्डब्रेक आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे.