LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Maharashtra Breaking news 11 November 2022 Latest Update: दिवसभरातील घडामोडी, जाणून घ्या कुठे काय घडलं

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Maharashtra Breaking news  11 November 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Maharashtra Breaking news 11 November 2022 Latest Update

 Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
 

Nov 11, 2022  |  10:24 AM (IST)
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरून हकालपट्टी 

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना केरळ कलामंडलम डीम्ड-टू-बी विद्यापीठाच्या कुलपती पदावरून हटवण्यात आले आहे. डाव्या लोकशाही आघाडी (LDF) सरकारने गुरुवारी (10 नोव्हेंबर) केरळ कलामंडलम डीम्ड विद्यापीठाच्या नियमांमध्ये सुधारणा केली. जेणेकरून राज्यपालांना कुलपती पदावरून हटवता येईल आणि आता कला-संस्कृती क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीची या पदावर नियुक्ती केली जाईल.

Nov 11, 2022  |  06:33 AM (IST)
काँग्रेसने गुजरातच्या ४६ उमेदवारांची दुसरी यादी केली जाहीर

काँग्रेस पक्षाने गुरुवारी उशिरा गुजरात निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीतील 46 उमेदवारांना तिकिटांचे वाटप करण्यात आले आहे. यापूर्वी पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत 43 उमेदवारांना तिकीट देण्यात आले होते.

Nov 11, 2022  |  06:29 AM (IST)
राहुल गांधी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत, भारत जोडो यात्रेत सामील

काँग्रेसची भारत जोडी यात्रा सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून जात आहे. गुरुवारी यात्रेच्या 64व्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह काँग्रेस खासदार राहुल गांधी नांदेडमध्ये यात्रेत सहभागी झाल्या होत्या.
 

Nov 11, 2022  |  06:23 AM (IST)
पेणनजीक संशयास्पद आढळून आलेली वस्तू ही डमी बॉम्ब

मुंबई - गोवा हायवेवरील पेणनजीक संशयास्पद आढळून आलेली वस्तू ही डमी बॉम्ब  असल्याचे निष्पन्न झालं आहे. सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर संशयास्पद बॉम्ब निकामी करण्यात आला. गुरुवारी (10 नोव्हेंबर) सायंकाळच्या सुमारास जिलेटन सदृश्य वस्तू सापडल्या होत्या.

Nov 11, 2022  |  06:20 AM (IST)
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला दिलासा नाहीच, परवाना बंदी कायम

जॉन्सन अँड जॉन्सनच्या 'बेबी टाल्कम पावडर' उत्पादनाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय योग्यच असून नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचा दावा राज्य सरकारनं हायकोर्टात केला आहे.