LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Maharashtra Breaking news 01 November 2022 Latest Update: राज्यातील सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला होणार

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Maharashtra Breaking news 01 November 2022 Latest Update
Maharashtra Breaking news 01 November 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Nov 01, 2022  |  10:49 AM (IST)
राज्यातील सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला होणार

राज्यातील सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला होणार आहे. 4 आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.

Nov 01, 2022  |  09:10 AM (IST)
LPG सिलेंडर 115रुपयांनी स्वस्त

सरकारने व्यावसायिक एलपीजीच्या किंमती कमी केल्या आहेत. मात्र घरगुती एलपीजीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 115.50 रुपयांनी कमी केली आहे.

Nov 01, 2022  |  08:02 AM (IST)
पाच सदस्यीय घटनापीठासमोर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर होणार सुनावणी

 महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी ही सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर होणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या असल्याने ही सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली होती.

Nov 01, 2022  |  08:01 AM (IST)
पुण्यात सर्वात कमी तापमानाची नोंद

 राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद पुण्यात झाली आहे. पुण्यात 12.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे. सरासरीच्या तुलनेत हे तापमान 3.2 अंशानं घटलं आहे.

Nov 01, 2022  |  08:00 AM (IST)
अमरावतीत आज प्रहारचा मेळावा, बच्चू कडू यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

अमरावतीत आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचा मेळावा होणार आहे. आमदार रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादाबाबत बच्चू कडू आज त्यांची भूमिका मांडणार आहेत. मेळाव्यासाठी  'मै झुकेगा नही' चे पोस्टर लावण्यात आले आहेत. त्यामुळे कडू मेळाव्यात काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.