LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Maharashtra Breaking news 02 November 2022 Latest Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Maharashtra Breaking news 02 November 2022 Latest Update

Nov 02, 2022  |  07:40 AM (IST)
शरद पवारांच्या उपस्थितीत उद्यापासून शिर्डीत 3 दिवस राष्ट्रवादीचे अधिवेशन

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत 3 ते 5 नोव्हेंबर या कालावधीत अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात ओला दुष्काळ, शेतकरी कर्जबाजारीपणा आदी गंभीर विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

Nov 02, 2022  |  07:36 AM (IST)
अभिनेता शाहरुख खानचा आज 57 वा वाढदिवस

अभिनेता शाहरुख खान याचा आज 57 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने वांद्रे इथल्या निवासस्थानी मन्नत घराबाहेर मध्यरात्री चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली.

Nov 02, 2022  |  07:36 AM (IST)
लिफ्ट कोसळल्याने गोराई चारकोपमध्ये 62 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू

गोराई चारकोपमध्ये रहिवाशी इमारतीतील चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट वेगात खाली आदळली. या घटनेत एका 62 वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू झाला आहे.  नगीना अशोक मिश्रा असं या मृत महिलेचं नाव आहे.