LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Maharashtra Breaking news 03 November 2022 Latest Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Maharashtra Breaking news 03 November 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  BCCL
Maharashtra Breaking news 03 November 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Nov 03, 2022  |  05:27 PM (IST)
इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार:इम्रान जखमी, रुग्णालयात दाखल

 पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारविरोधी रॅलीत गोळीबार झाला आहे. त्यात इम्रान यांच्यासह त्यांचे 4 सहकारी जखमी  झाले आहेत.

Nov 03, 2022  |  11:36 AM (IST)
राज्यस्तरीय रोजगार मेळावा, नियुक्तीपत्रे देण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात
राज्यस्तरीय रोजगार मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्रे देण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात
Nov 03, 2022  |  11:34 AM (IST)
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक, सकाळी 11 वाजेपर्यंत 9.72 टक्के मतदान

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक
सकाळी 11 वाजेपर्यंत 9.72 टक्के मतदान
सकाळी 7 वाजल्यापासून 256 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू

Nov 03, 2022  |  11:30 AM (IST)
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
नेरळ रेल्वेस्थानकात मालगाडीत बिघाड 
अर्ध्या तासापासून कर्जत-मुंबई वाहतूक विस्कळीत

Nov 03, 2022  |  11:16 AM (IST)
फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाने शेअर बाजारात घसरण

आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याज दरवाढीमुळे अमेरिकन शेअर बाजारात मोठी पडझड झाली. त्याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स  60500 अंकांखाली तर निफ्टी 18000 अंकांखाली सुरू झाला. 

Nov 03, 2022  |  07:25 AM (IST)
7 विधानसभा मतरसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू

देशात सहा राज्यांत 7 विधानसभा मतरसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू
 

Nov 03, 2022  |  07:24 AM (IST)
नाशिकमध्ये फर्नीचरच्या गोदामाला आग

नाशिकमध्ये एका फर्नीचरच्या गोदामाला आग लागली आहे. ही आग इतकी भीषण आहे की त्यात ५ घरे जळून खाक झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाद्या घटनास्थळी पोहोचल्या असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. 

Nov 03, 2022  |  07:23 AM (IST)
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झाले. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्याविरोधात ७ उमेदवार रिंगणात आहेत.