LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Maharashtra Breaking news 04 November 2022 Latest Update:  संतोष बांगर यांच्या अडचणीत पुन्हा वाढ; पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Maharashtra Breaking news 04 November 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Maharashtra Breaking news 04 November 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Nov 04, 2022  |  11:32 AM (IST)
 संतोष बांगर यांच्या अडचणीत पुन्हा वाढ; पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप

आमदार बांगर यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे ज्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली आहे, त्याने याविषयी वरिष्ठांकडे लेखी तक्रार देखील केली असल्याचं समोर आले आहे.

Nov 04, 2022  |  08:45 AM (IST)
मुख्यमत्र्यांच्या उपस्थितीत एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची आज बैठक

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या संचालक मंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दुपारी अडीच वाजता बैठक होणार आहे.  सत्तांतरानंतर पहिल्यांदाच आज महामंडळाची बैठक चार महिन्यांनंतर पार पडणार आहे. यात अनेक महत्त्वाचे निर्णय होणार आहेत.
 

Nov 04, 2022  |  06:51 AM (IST)
भारतीय कर्मचाऱ्यानं अॅपल कंपनीला 140 कोटींना फसवलं

 अॅपल कंपनीला कोट्यवधी रुपयांचा धोखा दिल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या धीरेंद्र प्रसाद याला दोषी ठरवण्यात आले आहे. याप्रकरणी धीरेंद्रला 20 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. धीरेंद्र याने अॅपल कंपनीसोबत जवळपास दहा वर्ष काम केले आहे. धीरेंद्रने 2018 पर्यंत कंपनीला 140 कोटींचा चुना लावल्याचा आरोप लावला.   

Nov 04, 2022  |  06:48 AM (IST)
प्रदूषणामुळे दिल्लीत आरोग्य आणीबाणीची परिस्थिती, नोएडात शाळा बंद

गुरुवारी प्रदूषणाने आपत्कालीन पातळी गाठली. यासोबतच CAQM (कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट) ने GRAP चा चौथा आणि शेवटचा टप्पा देखील कार्यान्वित केला आहे. यासह, आता राजधानीत प्रदूषणाचा लॉकडाऊन लागला आहे.

Nov 04, 2022  |  06:41 AM (IST)
तेलंगणातील मुनूगोडेत सर्वाधिक 77 टक्के मतदान, तर अंधेरी पूर्वमध्ये सर्वात कमी 31 मतदान 

तेलंगणामधील मुनूगोडे या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 77.55 टक्के मतदान झाले.  तर सर्वाधिक कमी म्हणजे 31.74 टक्के मतदान हे मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघात झाले. 
 

Nov 04, 2022  |  06:40 AM (IST)
 उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापुजा संपन्न

कार्तिकी एकादशी आहे. यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापुजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली.