LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Maharashtra Breaking news 05 November 2022 Latest Update: मुंबईच्या फॅशन स्ट्रीटवर भीषण आग, 15 ते 20 दुकाने जळून खाक

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Maharashtra Breaking news 05 November 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Maharashtra Breaking news 05 November 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Nov 05, 2022  |  02:44 PM (IST)
मुंबईच्या फॅशन स्ट्रीटवर भीषण आग, १५ ते २० दुकाने जळून खाक

मुंबईच्या फॅशन स्ट्रीटवर भीषण आग लागली आहे. या आगीत १५ ते २० दुकाने जळून खाक झाली आहेत. सुदैवाने यात कुठलीही जिवीतनाही झालेली नाही. अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश मिळाले आहे. 

Nov 05, 2022  |  11:09 AM (IST)
मालेगावात भीषण अग्नितांडव; अनेक यंत्रमाग कारखाने आगीच्या भक्ष्यस्थानी

नाशिकच्या मालेगावमधील द्याने शिवारात एक मोठी दुर्घटना घडली. यात अनेक यंत्रमाग कारखान्यांना आग लागल्याने भीषण अग्नितांडव पाहायला मिळाला. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली

Nov 05, 2022  |  10:51 AM (IST)
AURANGABAD |  विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतला मनपातील प्रलंबित विकासकामांचा आढावा

राज्यातील सर्वच महापालिका निवडणुका लांबणीवर गेल्याकारणाने महानगर पालिकेच्या कामकाजावर प्रशासनाचे लक्ष नसून अनेक विकासकामे लांबणीवर पडलेली आहेत. याच अनुषंगाने डिसेंबर मध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी संभाजीनगर महानगर पालिकेच्या अंतर्गत होणाऱ्या विकास कामाचा आढावा विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतला.  या मध्ये मनपा क्षेत्रातील विकास व प्रलंबित कामांची त्यांनी माहिती घेतली.  त्याबरोबरच मनपा व स्मार्ट सिटी कार्यालयाच्या सर्व खातेप्रमुखांसमवेत बैठक घेऊन चर्चा केली.

Nov 05, 2022  |  10:40 AM (IST)
नाशिक रेल्वे स्थानकात गाडीला आग

नाशिक रेल्वे स्थानकावर एका गाडीला इंजिनमध्ये आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. 

Nov 05, 2022  |  07:10 AM (IST)
दिल्लीत 4 डिसेंबरला महानगरपालिका निवडणूक

दिल्ली महानगरपालिका  निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने  शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन एमसीडी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दिल्लीत महानगरपालिका निवडणुकीसाठी 4 डिसेंबरला मतदान होणार असून 7 डिसेंबरला निकाल जाहीर होईल. 

Nov 05, 2022  |  07:08 AM (IST)
Gujarat Elections 2022 : गुजरात विधानसभेसाठी काँग्रेसच्या 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी  काँग्रेसने आपली 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या या उमेदवारांच्या यादीत पोरबंदरमधून अर्जुन मोधवाडिया आणि घाटलोडियामधून आणि याज्ञिक यांना तिकीट देण्यात आले आहे.

Nov 05, 2022  |  07:06 AM (IST)
Jalgaon News : जळगावात तुरीच्या पिकांत चक्क गांजाची शेती! 61 लाखांची झाडे जप्त

एरंडोल तालुक्यातील खडकीसिम शेतशिवारातील गांजाची शेती स्थानिक पोलिसांनी उधळून लावली आहे. यावेळी पोलिसांनी तब्बल 61 लाख 25 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकीसिम येथील दिगंबर पंडित पाटील यांच्या शेतात आणि नितीन डिगंबर पाटील यांच्या तूर पिकाच्या शेतामध्ये गांजा या मादक पदार्थाची लागवड केली गेली होती.