LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Maharashtra Breaking news 06 November 2022 Latest Update: अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Maharashtra Breaking news 06 November 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Maharashtra Breaking news 06 November 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Nov 06, 2022  |  02:14 PM (IST)
मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे आज पुन्हा एकत्र येणार

राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर शिंदे आणि ठाकरे यांच्या भेटी सातत्याने  अनेक कार्यक्रमात एकत्र पाहायला मिळत आहेत. प्रशांत दामले यांच्या साडेबारा हजाराव्या प्रयोगाला तिघे एकत्र येणार आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. 

Nov 06, 2022  |  12:58 PM (IST)
अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी, औपचारिक घोषणा बाकी

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत लटके यांना 48 हजार 15 मते मिळाली आहेत. आतापर्यंत मतमोजणीच्या 13 फेरी झाल्या असून अद्याप 6 फेरी बाकी आहेत. आता फक्त लटके यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे.  लटके यांच्यानंतर सर्वाधिक मते नोटाला मिळाली आहेत. नोटाला तब्बल 9 हजार 547 मते मिळाली आहेत. भाजपच्या मूरजी पटेल यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला होता.  
 

Nov 06, 2022  |  12:31 PM (IST)
ऋतुजा लटकेंची विजयी घोडदौड, शिवसेना भवनाबाहेर सेलिब्रेशन

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या अपेक्षेप्रमाणे विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सकाळी आठ वाजता अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. याठिकाणी मतमोजणीच्या एकूण १९ फेऱ्या पार पडणार आहेत. यापैकी आठ फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून त्यामध्ये ऋतुजा लटके यांची आघाडी दिसत आहे. 

Nov 06, 2022  |  10:31 AM (IST)
अंधेरी पोटनिवडणुकीत नोटाला दुसर्‍या क्रमाकांची मते

अंधेरी पोटनिवडणुकीत नोटाला दुसर्‍या क्रमाकांची मते, ऋतुजा लटके यांना १४ हजार ६४८ मते


 

Nov 06, 2022  |  07:43 AM (IST)
Mumbai Accident : किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखाली ट्रकचा मोठा अपघात, वाहतूक मंदावली

मुंबईच्या सायन किंग्ज सर्कलच्या पुलाला धडकून आज सकाळी एका ट्रकचा मोठा अपघात  झाला  आहे. यामुळे किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखाली दक्षिणेकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रक अडकल्याने वाहतूक मंदावली आहे. यासंदर्भातील माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली. 

Nov 06, 2022  |  06:56 AM (IST)
भारत जोडो यात्रेत KGF-2 चे संगीत वापरले, कंपनीने राहुल गांधीसह तिघांवर गुन्हा दाखल 

राहुल गांधी यांच्या विरोधात कॉपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. KGF-2 ची म्युझिक लेबल कंपनी MTR ने ही केस दाखल केली आहे. भारत जोडो यात्रेच्या प्रमोशनमध्ये राहुल यांनी KGF-2 चे गाणे वापरले आहे.  ''समुंदर में लहर उठी है, ज़िद्दी ज़िद्दी है तूफ़ान चट्टानें भी काँप रही है, ज़िद्दी ज़िद्दी है तूफ़ान..." हे गाणे वापरण्यात आल्याचा आरोप कंपनीने केला आहे. 

Nov 06, 2022  |  06:53 AM (IST)
अंधेरीतील गोखले पूल उद्यापासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल अखेर सोमवार, 7 नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. 

Nov 06, 2022  |  06:52 AM (IST)
अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई; 29 कोटी रुपयांचे मसाले, ड्रायफ्रुट्स जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नवी मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली असून तब्बल 29 कोटी रुपयांचे अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. एफडीएने टीटीसी इंडस्ट्रीअल एरिया, MIDC तुर्भे, येथे 2 नोव्हेंबर रोजी धाड मारून कारवाई केली होती.

Nov 06, 2022  |  06:50 AM (IST)
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार

ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष अशा झालेल्या लढतीकडं संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी 3 नोव्हेंबरला मतदान पार पडलं होतं.