Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं एक मोठा निर्णय घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्येच एक कोरं पान लावून देण्यासह विद्यार्थ्यांना पुस्तकांसह वह्याही मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अशी माहिती दिली आहे.
केंद्र सरकारने लागू केलेले आर्थिक आरक्षण वैध असून हे आरक्षण घटनाविरोधी नसल्याचा निकाल घटनापीठाने दिला आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला आहे. मावळते सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने हा निकाल दिला आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली असून एक प्रवासी गंभीरित्या जखमी झाला आहे. जव्हार-सिल्वासा मार्गावर जयसागर डॅमजवळ नाशिक- सिल्वासा आणि जळगाव- सिल्वासा या दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर सहा दिवसांच्या उपचारानंतर शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्ये आलेल्या या थंडीच्या लाटेचे परिणाम महाराष्ट्रातही जाणवू लागले आहेत. पुणे, सातारा या भागांमध्ये तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, नवी मुंबई भागातही रात्रीच्या तापमानात घट झाल्याचं स्पष्टपणे लक्षात येतंय
तेलंगणा: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कामरेड्डी येथून पक्षाच्या भारत जोडो यात्रेच्या 61व्या दिवसाची सुरुवात केली.
#WATCH तेलंगाना: कांग्रेस सांसद राहुल गांधी ने पार्टी की भारत जोड़ो यात्रा के 61वें दिन की शुरूआत कामारेड्डी से की।
— ANI_HindiNews (@AHindinews) November 7, 2022
(सोर्स: AICC) pic.twitter.com/GKvVxqbO8F
धारावीत रविवारी एका 55 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. एका गटारात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.
Maharashtra | Unidentified body of a 55-year-old man found in a drain in Mumbai's Dharavi. Police reached the spot, recovered the body from the drain & sent it to Sion Hospital for post-mortem. Dharavi Police filed Accidental Death Report (ADR) & started further probe: Police
— ANI (@ANI) November 6, 2022
पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणा बिघडली होती, त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. सकाळी कामाला निघालेल्या चाकरमान्यांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. परंतु रेल्वेने ही यंत्रणा दुरुस्ती केली आणि लोकलसेवा सुरळीत झाली.
अमेरिका, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये $8 मध्ये ट्विटरचे ब्लू टिक सबस्क्रिप्शन सुरू करून, कंपनीचे नवीन मालक एलॉन मस्क यांनी अनेक नवीन घोषणा केल्या आहेत.
यंदा राज्यातील ९६ लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी ६५४ कोटी रुपये भरले. पण विमा कंपन्या भरपाई देत नसल्याच्या हजारो तक्रारी असतात. एवढी मोठी रक्कम भरूनही फायदा होत नसल्याचे दिसते. यात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने एक रुपयांत पीक विम्याची योजना आखली आहे. त्यात शेतकऱ्यांना फक्त १ रुपये भरावा लागेल.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होणार आहे.
पहिल्यांदाच दोन्ही गटाच्या प्रमुखांचे पुत्र आमने-सामने येणार आहे. विशेष म्हणजे दिवस एकच, मतदारसंघ सुद्धा एकच आणि कार्यक्रमाचा वेळ देखील एकच असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आज औरंगाबादच्या सिल्लोड दौऱ्यावर असणार आहे.