Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
मुंबईत आज संध्याकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी चंद्रग्रहण व्यवस्थित दिसण्यास सुरुवात होईल
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे झालेल्या भीषण अपघातात रिक्षामधील एकूण 4 व्यक्तींचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील कशेडी घाटात ट्रक आणि रिक्षा यांचा अपघात झाला असून या अपघातात चार व्यक्तींच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ₹ ५ लक्ष मदत जाहीर केली आहे.
— Uday Samant (@samant_uday) November 7, 2022
काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वतात निघालेली ही यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली.
राज्यात किमान आणि कमाल तापमानात सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशाने घसरण झाली आहे. सोमवारी राज्यातील नीचांकी 12.8 तापमान नाशकात नोंदवले गेले.