LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Maharashtra Breaking news 09 November 2022 Latest Update: संजय राऊत यांना जामीन मंजूर

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Maharashtra Breaking news 09 November 2022 Latest Update

Nov 09, 2022  |  01:13 PM (IST)
संजय राऊत यांना जामीन मंजूर

संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. प्रवीण राऊत यांनाही मंजूर झाला आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे.

Nov 09, 2022  |  07:59 AM (IST)
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड होणार देशाचे 50 वे सरन्यायाधीश

न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचूड  हे आज देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्यायमूर्ती चंद्रचूड यांना पदाची शपथ देतील. 

Nov 09, 2022  |  07:58 AM (IST)
दिल्ली-एनसीआर ते उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के

दिल्ली-एनसीआर ते उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. लखनौ, कानपूर, मुरादाबाद, बरेली, आग्रा आणि मेरठसह अनेक जिल्हे भूकंपाने हादरले आहेत. रात्री 8.52 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

Nov 09, 2022  |  07:57 AM (IST)
नेपाळमध्ये भूकंपाचं केंद्र, घर कोसळून सहा जणांचा मृत्यू

नेपाळमधील दोती जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. 6.30 रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद झाली. नेपाळमधील डोटीमध्ये घर कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे.