LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Maharashtra Breaking news 10 November 2022 Latest Update: संजय राऊत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Maharashtra Breaking news 10 November 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Maharashtra Breaking news 10 November 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Nov 10, 2022  |  12:15 PM (IST)
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट, 12 वर्षांच्या सुखी संसारानंतर काडीमोड

भारतीय टेनिसपटू  सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू  शोएब मलिक  यांचा घटस्फोट झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यातमध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सुरु होत्या.

Nov 10, 2022  |  12:13 PM (IST)
Earthquake : अंदमान निकोबारला भूकंपाचे धक्के बसले,रिश्टर स्केलची 4.3 तीव्रता

गुरुवारी पहाटे अंदमान आणि निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, 10 नोव्हेंबरला पहाटे 2.29  वाजता 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीखाली 10 किमी होती.

Nov 10, 2022  |  08:29 AM (IST)
Gujarat Election  2022: भाजप 30 हून अधिक नवे चेहरे मैदानात उतरवणार, अनेक दिग्गजांना धक्का देणार 

गुजरात निवडणुकीसंदर्भात भाजप मोठ्या सर्जिकल स्ट्राईकच्या तयारीत आहे. सूत्रांनुसार भाजप यावेळी 25 टक्क्यांहून अधिक नवीन चेहरे उतरवण्याच्या तयारीत आहे. 

Nov 10, 2022  |  07:21 AM (IST)
श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी अव्वल, गौतम अदानी बनू शकतात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत अब्जाधीश

ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत सातव्या स्थानावर पोहोचले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये झालेल्या वाढीमुळे मुकेश अंबानी लॅरी एलिसनला मागे टाकून आठव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचले आहेत.

Nov 10, 2022  |  07:20 AM (IST)
Nirav Modi Extradition: नीरव मोदी लवकरच भारतात येणार; लंडन उच्च न्यायालयाने फेटाळला अर्ज

Nirav Modi Extradition: नीरव मोदी लवकरच भारतात येणार;  लंडन उच्च न्यायालयाने फेटाळला अर्ज 

Nov 10, 2022  |  06:34 AM (IST)
 संजय राऊतांच्या जामिनावरील स्थगितीच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी

तब्बल 100 दिवसानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची बुधुवारी (9 नोव्हेंबर) तुरुंगातून सुटका झाली. मात्र, या जामिनाला ईडीचा  विरोध कायम आहे. या विरोधात ईडीने उच्च न्यायालयात अपिल केलं आहे. त्यावर न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. 

Nov 10, 2022  |  06:29 AM (IST)
आता 103 आमदार निवडून आणणार, पुढचा मुख्यमंत्री आपल्या शिवसेनेचाच होणार- संजय राऊत 

संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात जामीन मंजुर झाला आहे. राऊत बाहेर येताच त्यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत केलं. राऊत घरी गेल्यावर तिथं मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केली होती. यावेळी राऊतांनी बोलताना थेट विरोधी पक्षांना जाहीर आव्हान दिलं. मला अटक करून त्यांनी देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चुक म्हणजे संजय राऊतांना अटक. मला 103 दिवस कारागृहात ठेवलं, आता मी 103 आमदार निवडून आणणार आणि पुढचा मुख्यमंत्री आपल्या शिवसेनेचाच होणार असा गर्जनाही संजय राऊत यांनी केली.

Nov 10, 2022  |  06:27 AM (IST)
 मेटाचा दणका! तब्बल 11,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना एका क्षणात काढलं

 ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात सुरु आहे. 'द वॉल स्ट्रीट जर्नल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मेटानं हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची तयारी केली आहे. 11,000हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स इंक. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार बुधवारी आपल्या कंपनीतील कामगारांना मोठ्या प्रमाणावर काढून टाकण्याची योजना आखत आहे. 

Nov 10, 2022  |  06:25 AM (IST)
भारत जोडो यात्रेचा आज राज्यात चौथा दिवस, राष्ट्रवादीचे नेतेही होणार सहभागी

राज्यात तिसऱ्या दिवशीही भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही यात्रा कृष्नूर ते नांदेड मार्गक्रमण करत आहे. राज्यातील भारत जोडो यात्रेच्या चौथ्या दिवशी राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होणार आहेत. आज काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार सहभागी होऊ शकतात.