LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Maharashtra Breaking news 12 November 2022 Latest Update: जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Maharashtra Breaking news 07 November 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Maharashtra Breaking news 07 November 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Nov 12, 2022  |  03:16 PM (IST)
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 
 

Nov 12, 2022  |  02:47 PM (IST)
शाहरुख खानला मुंबई विमानतळावर कस्टमनं आकारला 7 लाखांचा दंड

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला मुंबई विमानतळावर कस्टम्सने रोखले. शारजाहून त्याने 18 लाख घड्याळाची कवर आणली. अभिनेत्याकडून 7 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. 

Nov 12, 2022  |  12:52 PM (IST)
आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून गेला, मध्य प्रदेश सरकारने मिळवला

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाईस पार्कनंतर आता ऊर्जा उपकरण निर्मितीचा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून गेला आहे. मध्य प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाने यात बाजी मारली आहे. केंद्र सरकारने सुद्धा यासाठी हिरवा कंदील दिला असल्याचे वृत दैनिक लोकमतने दिले आहे.


 

Nov 12, 2022  |  07:42 AM (IST)
अलिबागच्या तहसीलदार मिनल दळवी अँटी करप्शनच्या जाळ्यात, दोन लाखांच्या लाच प्रकरणी ताब्यात

अँटी करप्शनच्या नवी मुंबई येथील पथकाने ही मोठी कारवाई केली आहे.या पथकाने राकेश चव्हाण याला रंगेहाथ अटक केली तर तहसीलदार मिनल कृष्णा दळवी यांना ताब्यात घेतलं.  जमीन विषयावर अपील सुनावणी सुरु असताना त्याचा निकाल एकाच्या बाजूने देण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी दळवी यांनी केली होती. 

Nov 12, 2022  |  06:53 AM (IST)
हिमाचलमधील 68 जागांवर सकाळी 8 वाजल्यापासून मतदान सुरू, 412 उमेदवार रिंगणात

हिमाचलमधील 68 जागांवर सकाळी 8 वाजल्यापासून मतदान सुरू, 412 उमेदवार रिंगणात

Nov 12, 2022  |  06:50 AM (IST)
अनिल देशमुखांच्या जामीन अर्जास विरोध; सीबीआयने कोर्टात केला मोठा दावा

मनी लाँड्रिंगविषयी पीएमएलए कायद्यांतर्गत दाखल झालेला गुन्हा व भ्रष्टाचार व खंडणीच्या आरोपांविषयी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा हे दोन्ही वेगवेगळे आहेत. पीएमएलए प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांचा सीबीआयने त्यांच्यावर केलेल्या आरोपांशी संबंध येत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने देशमुख यांना पीएमएलए प्रकरणात दिलेल्या जामीन आदेशाचा फायदा ते सीबीआय प्रकरणात घेऊ शकत नाहीत’, असा दावा सीबीआयने केला आहे. 

Nov 12, 2022  |  06:46 AM (IST)
Jitendra Awhad Arrest : अटकेत असलेले जितेंद्र आव्हाड रुग्णालयात, हायपर टेन्शनचा त्रास!

हर हर महादेव चित्रपटाविरुद्ध केलेल्या आंदोलनाप्रकरणी जितेंद्र आव्हाड अडचणीत आले आहेत. शुक्रवारी दुपारी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली. यानंतर आव्हाड हे ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्येच होते. ठाण्याच्या कोर्टात आव्हाड यांना आज हजर करण्यात आलं नाही. 
 

Nov 12, 2022  |  06:42 AM (IST)
मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का,गजानन किर्तीकरांचा शिंदे गटात प्रवेश

गजानन किर्तीकरांचा शिंदे गटात प्रवेश