LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Maharashtra Breaking news 13 November 2022 Latest Update: दिवसभरातील घडामोडी, जाणून घ्या कुठे काय घडलं

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Maharashtra Breaking news 13 November 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Maharashtra Breaking news 13 November 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Nov 13, 2022  |  01:05 PM (IST)
'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा अपघातात मृत्यू

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा अपघातात मृत्यू 

Nov 13, 2022  |  06:41 AM (IST)
इजिप्तमध्ये बसचा भीषण अपघात, कालव्यात बस कोसळून 22 प्रवाशांचा मृत्यू  

इजिप्तच्या उत्तर डकहलिया प्रांतातील मिस्रमध्ये बसचा भीषण अपघात  झाल्याची घटना घडली. प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात पडल्याची घटना घडली. यामध्ये 22 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण यामध्ये जखमी झाले आहेत.

Nov 13, 2022  |  06:40 AM (IST)
रेल्वेत मोबाईल चोरणारा सराईत चोरटा हातातील बेड्यांसह पळाला

रेल्वेत मोबाईल चोरणारा सराईत चोरटा हातातील बेड्यांसह पळाल्याची घटना रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनमध्ये  घडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस या चोरट्याच्या मागावर होते. नैसर्गिक विधीचं कारण सांगत चोरट्यानं पोलिसांच्या हातावर तुरी देत पोबारा केला. 

Nov 13, 2022  |  06:33 AM (IST)
 राज्यातील 250हून अधिक लेखकांचा भारत जोडोला पाठिंबा

कन्याकुमारी ते काश्मीर अशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. राज्यातील 250हून अधिक लेखक आणि कलाकारांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला आहे.

Nov 13, 2022  |  06:29 AM (IST)
Earthquake Delhi NCR : दिल्ली-एनसीआर, उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के

दिल्ली एनसीआरमध्ये भूकंप झाला आहे. हा भूकंप शनिवारी रात्री 7.57 वाजता झाला. हा भूकंप 5.4 एवढ्या  रिश्टर स्केलचा होता. भूकंपाचे धक्के इतके जबरदस्त होते की लोक घराबाहेर पळू लागले. 

Nov 13, 2022  |  06:28 AM (IST)
सिंधुदुर्गातील निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ, भाजप-शिंदे गटाचा दणदणीत विजय

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात युतीच्या माध्यमातून झालेल्या पहिल्याच निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय. सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) युतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला.