LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Maharashtra Breaking news 16 November 2022 Latest Update:Vinayak Mete यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी वाहन चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Maharashtra Breaking news 16 November 2022 Latest Update:
फोटो सौजन्य:  Times Now
Maharashtra Breaking news 16 November 2022 Latest Update:

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Nov 16, 2022  |  01:58 PM (IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार 

Nov 16, 2022  |  11:46 AM (IST)
Vinayak Mete यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी वाहन चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Vinayak Mete यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी वाहन चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Nov 16, 2022  |  10:20 AM (IST)
Pune CNG Gas Price Hike: पुण्यात मध्यरात्रीपासून  सीएनजीची दरवाढ

पुणेकऱ्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. पुण्यात आजपासून सीएनजी गॅस दरात वाढ झाली आहे. पुण्यात सीएनजी दरात  प्रति किलो मागे एक रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यात आता सीएनजी 92 रुपये प्रति किलो या दराने मिळणार आहे.  

Nov 16, 2022  |  10:16 AM (IST)
आज G20 शिखर परिषदेचा दुसरा दिवस, PM मोदींची 8 देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इंडोनेशियातील बाली येथे होणाऱ्या G20शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आठ देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. पंतप्रधान मोदी इंडोनेशिया, स्पेन, फ्रान्स, सिंगापूर, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड किंग्डमच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.

Nov 16, 2022  |  08:38 AM (IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौ-यात शिंदे गटातील आमदारांची नाराजी 

 शिंदे गटात अंतर्गत धुसफूस सुरु असल्याची चर्चा होती. शिंदे गटातील दोन आमदारांमधील वाद आता चव्हाट्यावर आल्याने या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यात दोन आमदारांची नाराजी उघडपणे पहायला मिळाली आहे. यामुळे शिंदे गटात फुट पडल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

Nov 16, 2022  |  08:37 AM (IST)
 शिंदे गटातील आमदार  बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार 

 शिंदे गटातील आमदार आज बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत. 17 तारखेला बाळासाहेबांच्या स्मृतिदिनादिवशीचा वाद टाळण्यासाठी आज अभिवादन करणार आहेत.  

Nov 16, 2022  |  06:56 AM (IST)
मुंबई महापालिकेच्या प्रभाग संख्या वाढवण्याच्या निर्णयाबाबत सुनावणी

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील बृहन्मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या वाढवण्याचा निर्णय रद्द करून ती पूर्वरत प्रभाग रचना करण्याच्या राज्य सरकारच्या नव्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं आव्हान देण्यात आलं आहे. या याचिकेवर आज तातडीनं सुनावणी घेण्याचं हायकोर्टानं ठरवलं आहे. 

Nov 16, 2022  |  06:55 AM (IST)
 व्हॉट्सअॅप इंडियाचे प्रमुख अभिजित बोस यांनी राजीनामा दिला 

व्हॉट्सअॅप इंडिया या मेसेजिंग अॅपचे प्रमुख अभिजित बोस आणि मेटा इंडियाचे सार्वजनिक धोरण संचालक राजीव अग्रवाल यांनीही आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर आता शिवनाथ ठुकराल यांची व्हॉट्सअॅप इंडियासह मेटाच्या सर्व प्लॅटफॉर्मच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Nov 16, 2022  |  06:55 AM (IST)
उन्हाळ्याची सुट्टी, गणपती, दिवाळी आणि नाताळची सुट्टी बंद करण्यासाठी जनहित याचिका

मुंबई उच्च न्यायालयाच्या दीर्घकालीन सुट्ट्यांचा परिणाम न्यायदानावर होत असल्याचा दावा करत  याचिकेतून मुंबई उच्च न्यायालयात या सुट्ट्या कमी करण्याची मागणी करत याचिका दाखल झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाला उन्हाळ्याची सुट्टी, गणपती, दिवाळी आणि नाताळच्या नावाखाली महिनाभर किंवा आठवडाभर देण्यात येणाऱ्या सुट्ट्यांना सबिना लकडावाला महिलेनं वकील मॅथ्यू नेदुमपारा आणि शरद कोळी यांच्यामार्फत याचिकेतून आव्हान दिलं आहे. न्यायालयाला सुट्ट्या देण्याच्या या ब्रिटिशकालीन प्रथेला याचिकेतून विरोध करण्यात आला आहे. या दीर्घकालीन न्यायालयीन सुट्ट्यांमुळे न्यायदान प्रक्रियाही कोलमडून गेली आहे. 

Nov 16, 2022  |  06:54 AM (IST)
राजधानी दिल्लीत थंडी वाढली, जम्मू-लडाख-उत्तराखंडमध्ये पावसाची शक्यता

देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील राज्यांमध्ये आता धुक्याने दार ठोठावले असून किमान तापमान 15 अंशांवर पोहोचले आहे. त्याचबरोबर हिमाचल प्रदेश ते काश्मीरपर्यंत बर्फवृष्टी होत आहे.दिल्लीतील  हवामान आज किमान तापमान 17 अंशांपर्यंत तर कमाल तापमान 28 अंशांपर्यंत नोंदवले जाऊ शकते.