LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Maharashtra Breaking news 31 October 2022 Latest Update: जय उत्तर प्रदेशही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोजपूरीतून दिल्या छटपूजेच्या शुभेच्छा

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Maharashtra Breaking news 31 October 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Maharashtra Breaking news 31 October 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Oct 31, 2022  |  11:56 AM (IST)
सोलापूरात उसाची ट्रॉली अंगावर पडून महिलेचा मृत्यू

सोलापूरात उसाने भरलेली ट्रॉली घेऊन जात असताना ही ट्रॉली महिलेच्या अंगावर पडला आहे. अक्कलकोट तालुक्यातील मनगोळीतील ही घटना असून या दुर्घटनेत महिला गंभीर जखमी झाली होती. खासगी वाहनाने सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कमल गेजगे असे मृत महिलेचे नाव आहे.                          
 

Oct 31, 2022  |  11:16 AM (IST)
BMC मधील 76 कामांची कॅगकडून होणार चौकशी

भाजपकडून शिवसेनेच्या नेत्यांवर एकपाठोपाठ आरोप सुरू आहे. तर दुसरीकडे मुंबई पालिकेमध्ये झालेल्या 76 कामांची थेट कॅगकडून चौकशी होणार आहे.  आगामी काळात भ्रष्टाचाराच्या मुद्यावर शिवसेनेला घेरण्याची रणनीती भाजपने आखली असल्याचे सांगितले जात आहे. 

Oct 31, 2022  |  10:44 AM (IST)
अकोल्यात आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौड संपन्न

अकोला शहरात आज क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व केंद्र शासनाच्या विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त वसंत देसाई स्टेडियम, येथे सकाळी 8 वाजता राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते या एकता दौडमध्ये अकोला शहर व जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी स्थानिक विद्यालय व महाविद्यालयातील स्काऊट-गाईड,एन.सी.सी. व एन.एस.एस पथकातील विद्यार्थी,शारीरीक शिक्षक, विविध संघटनेचे पदाधिकारी, युवक-युवती, खेळाडू, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Oct 31, 2022  |  10:07 AM (IST)
सेन्सेक्स 601 अंकांनी वधारला

आज सेन्सेक्स 601 अंकांनी वधारला असून सध्या सेन्सेक्स 60 हजार 561 अंकावर आहे. 

Oct 31, 2022  |  08:23 AM (IST)
मोरबी दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, आकडा वाढण्याची भीती

गुजरातमधील मोरबी येथील केबल ब्रिज दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढत आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत मृतांची संख्या 143 वर पोहोचली आहे. बचावकार्यासाठी लष्कराची मदत घेतली जात आहे.

Oct 31, 2022  |  08:07 AM (IST)
जय उत्तर प्रदेशही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोजपूरीतून दिल्या छटपूजेच्या शुभेच्छा

जय उत्तर प्रदेशही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोजपूरीतून दिल्या छटपूजेच्या शुभेच्छा

Oct 31, 2022  |  05:49 AM (IST)
अकोल्यात शिवसेना उपशहरप्रमुखावर सपासप वार करत हत्या

अकोल्यात शिवसेना उपशहरप्रमुखावर सपासप वार करत हत्या

Oct 31, 2022  |  05:46 AM (IST)
आमिर खानच्या आईला हृदयविकाराचा झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानच्या चाहत्यांसाठी एक काळजी वाढवणारी बातमी आहे. कारण आमिर खानची आई झीनत यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या पाचगणीच्या राहत्या घरी आमिरच्या आईला हृदयविकाराचा झटका आला. ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आमिरने आईला तात्काळ ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले आहे. 
 

Oct 31, 2022  |  05:44 AM (IST)
दहशतवाद्यांच्या कुरापती पुन्हा वाढल्या, ड्रोनच्या साहाय्याने शस्रत्रांचा पुरवठा

 जम्मू-काश्मीर पोलिसांनी आरएस पुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ ड्रोनद्वारे टाकलेल्या शस्त्रात्रं जप्त केली आहेत. त्यामुळे याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेची एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली.

Oct 31, 2022  |  05:43 AM (IST)
मुंबईत गटारात राहिल्यासारखं वाटत आहे म्हणणाऱ्या जुही चावलाला फडणवीसांनी सुनावलं

जुही चावला ही मुंबईतील हवेवरून केलेल्या टीकेने ती पुन्हा चर्चेत आली आहे. दक्षिण मुंबईतील काही भागातील प्रदुषित हवेबाबत भाष्य केलं.जुही चावलाच्या या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिला सुनावलं आहे. मुंबई हे उत्तम शहर आहे. एक खरं आहे की इन्फ्रा स्ट्रक्चरच्या काही कमतरता आहेत. महापालिकेच्या भ्रष्टाचारामुळे मुंबईमध्ये काही अडचणी लोकांना सहन कराव्या लागत आहेत. आता आमचं सरकार आलं आहे आता मुंबई बदलणार आहे त्यामुळे मुंबईला सरसकट बोलणं हे अतिशय चुकीचं ठरेल. मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे त्यामुळे सेलिब्रेटींनी अशा प्रकारचं वक्तव्य करताना विचारपुर्वक बोललं पाहिजे.

Oct 31, 2022  |  05:40 AM (IST)
मंत्र्यांचे राजीनामे मागाल तर आदित्य ठाकरेंचे दारू पार्ट्यांचे व्हिडीओ दाखवू; किरण पावरस्कर

 राज्यातील मंत्र्याचे राजीनामे मागाल तर आदित्य ठाकरे यांचे पार्ट्यामधल्या दारू पितानाचे व्हिडीओ दाखवू असा इशारा शिंदे गटाच्या किरण पावसकर यांनी दिला. मंत्री अब्दुल सत्तार यांचा दारुबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती.