LIVE BLOG
More UpdatesMore Updates

PM Modi Mother Death News Live Updates: हीराबेन मोदी यांची अंत्ययात्रा सुरू, 100 वर्षी घेतला अखेरचा श्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक, हिराबेन मोदी यांचं 100 व्या वर्षी निधन

PM Modi Mother Death News Live Updates
फोटो सौजन्य:  Times Now
PM Modi Mother Death News Live Updates

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक, हिराबेन मोदी यांचं 100 व्या वर्षी निधन झालं. 923 मध्ये जन्मलेल्या हिराबेन मोदी यांनी 18 जून रोजी वयाची 100 वर्षे पूर्ण केली होती.  गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात (UN Mehta Hospital)उपचार (Treatment)सुरू होते. 

Dec 30, 2022  |  08:49 AM (IST)
अनुपम खेर यांचे ट्विट 

चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट केले की, आदरणीय पंतप्रधान @narendramodi जी! तुमच्या मातोश्री 
 #हीराबेनजींच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले आणि अस्वस्थ झालो.तुमचे त्यांच्याबद्दलचे प्रेम आणि आदर जगात दिसून येत आहे.तुमच्या आयुष्यात तिची जागा कोणीही भरून काढू शकणार नाही! पण तुम्ही भारतमातेचे पुत्र आहात! देशाच्या प्रत्येक मातेचे आशीर्वाद तुझ्यावर आहेत.माझ्याही आईचा आशीर्वीद तुमच्यावर आहेत. 

Dec 30, 2022  |  08:47 AM (IST)
PM Modi Mother Death News : अशोक गेहलोत यांनी वाहिली श्रद्धांजली 

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करत आपला शोक व्यक्त केला आहे.  'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री श्रीमती हीराबेन जी यांच्या निधनाच्या बातमीने दु:ख झाले आहे. या कठीण प्रसंगी, मी शोकाकुल कुटुंबातील सदस्यांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो, देव त्यांना शक्ती देवो आणि दिवंगत आत्म्याला शांती देवो अशी प्रार्थना करतो.

Dec 30, 2022  |  08:45 AM (IST)
पीएम मोदी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचा शुभारंभ आणि राष्ट्रीय गंगा परिषदेची बैठक समाविष्ट आहे. पीएमओने ट्विट करून याविषयी माहिती दिली आहे. 

Dec 30, 2022  |  08:41 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हीराबाबेन मोदी यांना अजित पवारांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबाबेन मोदी यांचे निधन झाल्याचे समजून दुःख झाले.
त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला.मातृवियोगाचे दुःख मोठे असून ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधान महोदयांना मिळो. आम्ही सर्व पंतप्रधान आणि मोदी परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत.स्वर्गीय हीराबाबेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.अशा शब्दात अजित पवार यांनी शोक भावना व्यक्त केल्या. 

Dec 30, 2022  |  08:40 AM (IST)
मायावती यांची हीराबेन यांना श्रद्धांजली

बसपा नेत्या मायावती यांनी हीराबेन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 

Dec 30, 2022  |  08:39 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक, हिराबेन मोदी यांचं 100 व्या वर्षी निधन

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक, हिराबेन मोदी यांचं 100 व्या वर्षी निधन