Maharashtra, Haryana, Rajasthan, Karnataka Rajya Sabha Election 2022 LIVE Updates: हरयाणा, राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतून निवडल्या जाणार असलेल्या राज्यसभेच्या १६ खासदारांसाठी आज म्हणजेच शुक्रवार १० जून २०२२ रोजी मतदान होत आहे. उत्तर प्रदेश, तामीळनाडू, बिहार, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, पंजाब, तेलंगण, झारखंड आणि उत्तराखंडमधून राज्यसभेच्या ४१ खासदारांची बिनविरोध निवड झाली.