LIVE BLOG
More UpdatesMore Updates

७ जुलै २०२० च्या बातम्या: ताज्या बातम्या आणि मोठ्या घडामोडी

मराठी ताज्या बातम्या, ७ जुलै २०२० आणि मोठ्या बातम्या: दिवसभरातील प्रत्येक ताजी बातमी आपल्याला इथे एका क्लिकवर पाहायला मिळणार आहे. वाचा ७ जुलै २०२० च्या मुख्य बातम्या.
Tajya batmya
फोटो सौजन्य:  Times Now
आजच्या ताज्या बातम्या

मुंबई: मराठी ताज्या बातम्या, ७ जुलै २०२० आणि मोठ्या बातम्या: देश आणि जगभरातील अशा काही प्रमुख बातम्यांवर एक नजर, अशा बातम्या ज्या सामान्यांशी निगडीत आहेत. या ठिकाणी वाचा ७ जुलैच्या मुख्य बातम्या.

देशातील कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या ही आता ७ लाखांच्या पुढे गेला आहे. तर मागील २४ तासात ४६७ जणांचा मृत्यू झाला आहे. टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा आज ३९वा वाढदिवस साजरा केला जात आहे. यावेळी जगभरातील त्याच्या चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. याशिवाय दिवसभरातील इतरही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला इथे पाहता येतील. जाणून घ्या आजच्या दिवसभरातील ताज्या बातम्या

Jul 07, 2020  |  10:23 PM (IST)
कोरोना व्हायरस दरम्यान शूटिंगसाठी येणार नवीन गाईडलाईन्स, जावडेकरांची माहिती

कोरोना व्हायरस दरम्यान शूटिंगसाठी येणार नवीन गाईडलाईन्स

कोरोना व्हायरसच्या प्रकोपादरम्यान चित्रपटांचं शूटिंग सुरू करण्यासंदर्भात सरकार नवीन गाईडलाईन्स जारी करणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलीय.

वाचा अधिक
 

Jul 07, 2020  |  08:59 PM (IST)
सुशांतचा चेहरा पुन्हा आला फॅन्ससमोर, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सुशांतचा चेहरा पुन्हा आला फॅन्ससमोर, सोशल मीडियावर व्हायरल

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याचाच चेहरा असलेल्या सचिन तिवारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जाणून घ्या सुशांतच्या डुप्लिकेटबद्दल...

Jul 07, 2020  |  08:56 PM (IST)
राज्यात आजपर्यंत एकूण १,१८,५५८ रुग्ण बरे होऊन घरी 

राज्यात आजपर्यंत एकूण १,१८,५५८ रुग्ण बरे होऊन घरी 

राज्यात सलग पाचव्या दिवशी तीन हजारांपेक्षा जास्त कोरोना (Corona) बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) ५४ टक्क्यांवर कायम असून आज ३२९६ रुग्णांना घरी सोडण्यात (Discharge) आले.

वाचा अधिक

Jul 07, 2020  |  08:10 PM (IST)
Maharashtra Police Bharti: राज्यात मोठी पोलीस भरती, १० हजार जागा भरणार

राज्यात पोलीस शिपाई संवर्गातील १० हजार जागा भरणार

राज्यात १० हजार पोलीस शिपायांची भरती करण्याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याच्या निर्णयावरही शिक्कामोर्तब झाला आहे.

वाचा अधिक

Jul 07, 2020  |  08:09 PM (IST)
कोरोनाच्या चाचणीसाठी आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नाही, मुंबई महापालिकेचा निर्णय

कोरोनाच्या चाचणीसाठी प्रिस्क्रिप्शनची गरज नाही, BMCचा निर्णय

कोरोना व्हायरसच्या चाचण्यांसदर्भात मुंबई महापालिकेनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आता कोरोनाची चाचणी कुणीही करू शकेल, त्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज असणार नाही. जाणून घ्या या निर्णयाबाबत अधिक माहिती

वाचा अधिक
 

Jul 07, 2020  |  07:29 PM (IST)
EXCLUSIVE: '...तर राजीनामे देऊ', पारनेरच्या पाच नगरसेवकांचा निर्णय

...तर राजीनामे देऊ, पारनेरच्या पाच नगरसेवकांचा निर्णय

जर शिवसेनेत पुन्हा जाण्यास सांगितले तर राजीनामा देऊ असा इशाराच पारनेरच्या त्या पाच नगरसेवकांनी दिला आहे. पाहूयात संपूर्ण प्रकरण...

वाचा अधिक

Jul 07, 2020  |  07:29 PM (IST)
MSD Birthday: मुंबई पोलिसांनी खास शैलीत दिल्या महेंद्रसिंग धोनीला शुभेच्छा 

मुंबई पोलिसांनी दिल्या महेंद्रसिंग धोनीला शुभेच्छा

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा(ms dhoni birthday) आज वाढदिवस. जगभरातून त्याच्यावर बर्थडेसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुंबई पोलिसांनीही(mumbai police) भारताच्या माजी कर्णधार एमएस धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचा अधिक

Jul 07, 2020  |  06:58 PM (IST)
CBSE बोर्डाचा मोठा निर्णय, ९वी ते १२वीचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी

CBSE बोर्डाचा निर्णय, ९वी ते १२वीचा अभ्यासक्रम ३० टक्के कमी

CBSE Board syllabus reduction: कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा अद्याप सुरू होऊ शकल्या नाहीयेत. हेच लक्षात घेत सीबीएसई बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

वाचा अधिक

Jul 07, 2020  |  06:57 PM (IST)
फेरीवाल्यांच्या भवितव्याबाबत सरकारनं स्पष्ट केली भूमिका, जाणून घ्या

पाहा फेरीवाल्यांच्या भवितव्याबाबत सरकारनं स्पष्ट केली भूमिका

कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढत असतांनाच देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. मात्र राज्य सरकारनं मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना त्यांचं काम सुरू करण्यास परवानगी नाकारलीय.

वाचा अधिक

Jul 07, 2020  |  06:56 PM (IST)
महाविकास आघाडीत बिघाडी? संजय राऊत म्हणतात...

महाविकास आघाडीत बिघाडी? संजय राऊत म्हणतात...

महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांत मतभेद असल्याच्या अनेक घटना समोर आल्या त्यानंतर हे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार की नाही याबाबत चर्चा सुरू झाल्या. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय.

वाचा अधिक

Jul 07, 2020  |  06:21 PM (IST)
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ७ जुलै २०२०:

दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ७ जुलै २०२०:

दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

वाचा अधिक

 

Jul 07, 2020  |  05:45 PM (IST)
Poco M2 Pro लाँच, जाणून घ्या भारतातील त्याची किंमत-फीचर्स

Poco M2 Pro लाँच, जाणून घ्या भारतातील त्याची किंमत-फीचर्स

पोको एम 2 प्रो हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. जाणून घ्या या स्मार्टफोनची किमत आणि फीचर्स 

वाचा अधिक

Jul 07, 2020  |  05:11 PM (IST)
Priya Berde: अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासह अनेक कलाकारांचा राष्ट्रवादीत प्रवेश, पाहा व्हिडिओ 

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे आणि इतर कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

पाहा व्हिडिओ

Jul 07, 2020  |  04:45 PM (IST)
१४ वर्षाच्या मुलाचा १२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार,आरोपी अटकेत

१४ वर्षाच्या मुलाचा १२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार,आरोपी अटकेत

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे एका १४ वर्षाच्या मुलाने १२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.

वाचा अधिक

Jul 07, 2020  |  03:51 PM (IST)
सोने चांदी आजचा भाव, ७ जुलै २०२०: सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, पाहा आजचा भाव

सोने चांदी आजचा भाव, ७ जुलै २०२०

सोनं आणि चांदीच्या दरात मंगळवारी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या मुंबई, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सांगली, लातूर, बारामती या ठिकाणचे सोन्याचे भाव.

वाचा अधिक

Jul 07, 2020  |  03:48 PM (IST)
Health in monsoon: पावसाळ्यात चुकूनही हे पदार्थ खाऊ नका, नाहीतर पडाल आजारी

पावसाळ्यात चुकूनही हे पदार्थ खाऊ नका, नाहीतर पडाल आजारी

पावसाळ्याचे आगमन झाले आहे. पावसाळा सगळ्यांना जरी हवाहवासा वाटत असला तरी हा पाऊस अनेक आजार आपल्यासोबत घेऊन येतो. त्यामुळे पावसाळ्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

वाचा अधिक

Jul 07, 2020  |  03:47 PM (IST)
महाराष्ट्रात रेल्वेच्या ८७२ कर्मचारी आणि कुटुंबीयांना कोरोना

महाराष्ट्रात रेल्वेच्या ८७२ कर्मचारी आणि कुटुंबीयांना कोरोना

संपूर्ण देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात असल्याचं पहायला मिळत आहे. आता या कोरोनाने आपल्या विळख्यात रेल्वे कर्मचाऱ्यांनाही घेतलं आहे. 

वाचा अधिक

Jul 07, 2020  |  03:46 PM (IST)
चोरालाही कोरोनाची भीती, पीपीई किट घालून केली चोरी

चोरालाही कोरोनाची भीती, पीपीई किट घालून केली चोरी

एकीकडे राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा (corona patient) आकडा प्रचंड वेगाने वाढत आहे. मात्र साताऱ्यात(satara) एक वेगळीच घटना घडली आहे. चोरांनाही कोरोनाची भीती आहे. मात्र ही भीती असताना एका चोराने चक्क पीपीई किट (ppe kit) घालून चोरी केल्याची बातमी समोर आली आहे. 

वाचा अधिक

Jul 07, 2020  |  02:53 PM (IST)
पवारांची ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल: राऊत

पवारांची ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल: राऊत

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांची एक विशेष मुलाखत घेतली असून ही मुलाखत राजकीय क्षेत्रात खळबळ माजवेल असा दावा त्यांनी केला आहे.

वाचा अधिक

 

Jul 07, 2020  |  01:36 PM (IST)
भारतानंतर अमेरिका देणार चीनला झटका, मोठ्या कारवाईची शक्यता 

भारतानंतर अमेरिका देणार चीनला झटका, मोठ्या कारवाईची शक्यता 

अमेरिकेचे राज्य माईक पोंपिओ यांनी म्हटले आहे की अमेरिका चीनी अ‍ॅप टिक टॉकवर बंदी घालण्याचा विचार करीत आहे. भारताने या अॅपवर यापूर्वीच बंदी घातली आहे.

वाचा अधिक