कोचीन गोदीत सज्ज झालेली विमानवाहक नौका 'विक्रांत' सागरी चाचण्यांसाठी समुद्रात
कोचीन गोदीत सज्ज झालेली विमानवाहक नौका 'विक्रांत' सागरी चाचण्यांसाठी समुद्रात
'विक्रांत'मध्ये ७६ टक्के स्वदेशी साहित्याचा वापर
२६२ मीटर लांबी, ६२ मीटर रुंदी, ५९ मीटर उंची असलेल्या या जहाजात पाच मुख्य डेकसह १४ डेक आहेत.
जहाजात २३०० पेक्षा जास्त लहान-मोठी केबिन आहेत. या केबिनमधून १७०० जणांची व्यवस्था आहे. महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. जहाजाचे आरेखन भारतात करण्यात आले आहे.
'विक्रांत' जास्तीत जास्त २८ सागरी मैल वेगाने प्रवास करू शकते. एकदा इंधन भरुन अठरा सागरी मैल वेगाने सलग साडेसात हजार सागरी मैल प्रवास करण्याची क्षमता.
बंदरात २० नोव्हेंबर २०२० पासून सुरू असलेल्या चाचण्या पूर्ण. आता सागरी चाचण्यांना सुरुवात.