omicron cases increasing in India भारतात ओमायक्रॉनचे २१ रुग्ण, राजस्थानमध्ये ९ तर महाराष्ट्रात ८

omicron cases increasing in India कोरोना विषाणूचा नवा अवतार असलेल्या 'ओमायक्रॉन'ची बाधा झालेले २१ रुग्ण आतापर्यंत भारतात आढळले आहेत. यापैकी सर्वाधिक नऊ रुग्ण राजस्थानमध्ये तर आठ जण महाराष्ट्रात आढळले आहेत. कर्नाटकमध्ये दोन तर गुजरात आणि दिल्लीत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

21 omicron cases in India, 9 in Rajasthan and 8 in Maharashtra
भारतात ओमायक्रॉनचे २१ रुग्ण, राजस्थानमध्ये ९ तर महाराष्ट्रात ८ 
थोडं पण कामाचं
  • भारतात ओमायक्रॉनचे २१ रुग्ण, राजस्थानमध्ये ९ तर महाराष्ट्रात ८
  • कर्नाटकमध्ये दोन तर गुजरात आणि दिल्लीत प्रत्येकी एक रुग्ण
  • राजस्थानमधील ओमायक्रॉनबाधीत जयपूरमध्ये आढळले

omicron cases increasing in India नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा नवा अवतार असलेल्या 'ओमायक्रॉन'ची बाधा झालेले २१ रुग्ण आतापर्यंत भारतात आढळले आहेत. यापैकी सर्वाधिक नऊ रुग्ण राजस्थानमध्ये तर आठ जण महाराष्ट्रात आढळले आहेत. कर्नाटकमध्ये दोन तर गुजरात आणि दिल्लीत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

राजस्थानमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या संपर्कात आलेले भारतातील नागरिक असे नऊ जण ओमायक्रॉनबाधीत झाले आहेत. हे सर्वजण जयपूरमधील आहेत. महाराष्ट्रातील आठ जणांपैकी एक रुग्ण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत तर एक रुग्ण पुण्यात आढळला. सहा रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये आढळले. 

भारतात आढळलेल्या ओमायक्रॉनबाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अनेकांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत तर काहींच्या चाचण्यांचे अहवाल यायचे आहेत. विषाणूत बदल होणे ही नैसर्गिक बाब आहे. यामुळे घाबरून जाण्याऐवजी पात्र नागरिकांनी नियमानुसार कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे तसेच सर्वांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे; असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे. 

आतापर्यंतच्या संशोधनानुसार, ज्यांना ओमायक्रॉनची बाधा झाली त्यांच्यात आढळलेली कोरोनाची लक्षणे सौम्य स्वरुपाची आहेत. यामुळे ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने पसरत असला तरी तो धोकादायक नाही, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. पण हा अगदी प्रारंभीचा निष्कर्ष आहे. तज्ज्ञ या विषाणूबाबत आणखी संशोधन करत आहेत. महिन्याभरात आणखी नेमकेपणाने याबाबतची माहिती हाती येईल. ओमायक्रॉन बाबत आणखी माहिती हाती येईपर्यंत लसीकरणाचा वेग वाढवणे, मास्क घालणे, हात धुणे, स्वच्छता राखणे, सोशल डिस्टंस राखणे, कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे हेच नागरिकांना शक्य आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी