OMG..! एकाच रिक्षातून बाहेर पडले 27 प्रवासी, पोलिसांनी ही डोक्यावर मारला हात

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 11, 2022 | 14:52 IST

बकरी ईदच्या निमित्तानं वाहतूक सुरळीत करणार्‍या पोलीस पथकाने एक रिक्षा थांबवली तेव्हा त्यांची झोपच उडाली.

थोडं पण कामाचं
  • बकरी ईदच्या दिवशी एक हैराण करणार दृश्य पाहायला मिळाले.
  • हे दृश्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला.
  • तेव्हा पोलिसांनी पाहिले असता रिक्षा ओव्हरलोड झालेली दिसली.

उत्तर प्रदेश:  One Auto 27 Passengers: उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात बकरी ईदच्या दिवशी एक हैराण करणार दृश्य पाहायला मिळाले. हे दृश्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला. बकरी ईदच्या निमित्तानं वाहतूक सुरळीत करणार्‍या पोलीस पथकाने एक रिक्षा थांबवली तेव्हा त्यांची झोपच उडाली. खरं तर रिक्षा खूप वेगाने जात होती. तेव्हा पोलिसांनी पाहिले असता रिक्षा ओव्हरलोड झालेली दिसली. यानंतर पोलिसांनी रिक्षा थांबवून आतील दृश्य पाहिलं तेव्हा त्यांचा डोळ्यांवर विश्वास बसेना.

अधिक वाचा-  अन् दोन वर्षाच्या भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन बसला चिमुकला, वडील शोधत राहिले रूग्णवाहिका 

नमाज पढून लोक परत जात होते

हे प्रकरण फतेहपूरच्या बिंदकी कोतवाली भागातील आहे. येथे लालौली चौकात पोलिसांच्या पथकानं एक रिक्षा थांबवली. रिक्षा चालक सुसाट वेगानं गाडी चालवत होता. पोलिसांनी तपासणी केली असता रिक्षामध्ये चालकासह एकूण 27 जण होते.

पोलिसांनी एक एक करून सर्वांना बाहेर काढले. रिक्षामध्ये बसलेले सर्व लोक महाराहा गावातील रहिवासी होते. बकरी ईदची नमाज अदा करून सर्व लोक आपापल्या गावी जात होते. ड्रायव्हरसह केवळ चार जणांना बसणाऱ्या या रिक्षामध्ये बरेच लोक बसले होते. यानंतर पोलिसांनी रिक्षाचालकाला चांगलेच फटकारले आणि रिक्षा ताब्यात घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी