Nitish Kumar Cabinet list: नितीश मंत्रिमंडळात 31 चेहरे, पाहा मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी, कोणाला मिळालं कोणते मंत्रिपद

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 16, 2022 | 15:11 IST

Cabinet list of Bihar government 2022 : तेजस्वी यांचा मोठा भाऊ आणि आरजेडी नेते तेज प्रताप यादव यांच्याकडे वन आणि पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. या बाजूला शिक्षण मंत्रालयाचा विभाग आरजेडीच्या कोट्यात आहे, तर अर्थ मंत्रालय जेडीयूच्या अखत्यारीत आले आहे. भाजप-जेडीयू सरकारमध्ये अर्थमंत्रालय भगव्या पक्षाकडे होते.

थोडं पण कामाचं
 • बिहारमधील नितीश सरकारच्या (Nitish government) मंत्रिमंडळाचा (cabinet) आज विस्तार करण्यात आला.
 • राज्यपाल फागू चौहान यांनी राजभवनात (Raj Bhavan) 31 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
 • महाआघाडीच्या या सरकारमध्ये राजदला सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळाले आहे.

बिहार: Cabinet list of Nitish Kumar: बिहारमधील नितीश सरकारच्या (Nitish government) मंत्रिमंडळाचा (cabinet)  आज विस्तार करण्यात आला. राज्यपाल फागू चौहान यांनी राजभवनात (Raj Bhavan) 31 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. महाआघाडीच्या या सरकारमध्ये राजदला सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्याच्या कोट्यातून 16 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे, तर JD-U च्या 11 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.

काँग्रेसमधून दोन जणांना मंत्री करण्यात आले आहे. मांझी यांच्या पक्षातील एक सदस्य हम आणि एक अपक्ष असा मंत्री बनवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे गृहासह पाच मंत्रालयांचा कारभार तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यांच्याकडे आरोग्यासह चार खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. 

अधिक वाचा- मोठी बातमी: जवानांनी भरलेली बस कोसळली नदीत, 6 जवान शहीद; 30 हून अधिक जखमी

तेजस्वी यांचा मोठा भाऊ आणि आरजेडी नेते तेज प्रताप यादव यांच्याकडे वन आणि पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. या बाजूला शिक्षण मंत्रालयाचा विभाग आरजेडीच्या कोट्यात आहे, तर अर्थ मंत्रालय जेडीयूच्या अखत्यारीत आले आहे. भाजप-जेडीयू सरकारमध्ये अर्थमंत्रालय भगव्या पक्षाकडे होते.

हे आहे बिहार सरकारचे मंत्री

 • तेज प्रताप यादव-RJD
 • आलोक कुमार मेहता-RJD
 • अनीता देवी-RJD
 • सुरेंद्र प्रसाद यादव-RJD
 • चंद्रशेखर-RJD
 • ललित यादव-RJD
 • जितेंद्र कुमार राय-RJD
 • रामानंद यादव-RJD
 • सुधाकर सिंह-RJD
 • कुमार सर्वजीत-RJD
 • सुरेंद्र राम-RJD
 • शमीम अहमद-RJD
 • मो. शाहनवाज आलम-RJD
 • मो. इसरैल मंसूरी-RJD
 • कार्तिक सिंह-RJD
 • समीर कुमार महासेठ-RJD
 • विजय कुमार चौधरी-JDU
 • बिजेंद्र प्रसाद यादव--JDU
 • अशोक चौधरी-JDU
 • शीला मंडल-JDU
 • श्रवण कुमार-JDU
 • संजय झा-JDU
 • लेसी सिंह-JDU
 • मो. जामा खान-JDU
 • जयंत राज कुशवाहा-JDU
 • मदन सहनी-JDU
 • सुनील कुमार-JDU
 • मो. ए आलम-Congress
 • मुरारी प्रसाद गौतम-Congress
 • संतोश सुमन मांझी-HAM
 • सुमित सिंह-Independent

मंत्र्यांच्या शपथविधीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आज संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक घेणार असल्याचे सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी