चेन्नईतील 'मुळशी पॅटर्न', भर रस्त्यात गँगस्टरची कोयत्याने हत्या 

Brutal murder Caught on cam: चेन्नईत एका गँगस्टरची भर रस्त्यात हत्या करण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.  

crime
चेन्नईतील 'मुळशी पॅटर्न', भर रस्त्यात गँगस्टरची कोयत्याने हत्या   |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • चेन्नईत मुळशी पॅटर्न, गँगस्टरची आठ जणांनी मिळून केली भर रस्त्यात हत्या
  • पूर्व वैमनस्यातून करण्यात आली गँगस्टरची हत्या
  • हत्येनंतर आठही आरोपींनी केलं पोलिसांसमोर आत्मसमर्पण

चेन्नई: तामिळनाडू राज्यातील चेन्नईमध्ये (Chennai) एक अत्यंत भयंकर घटना समोर आली आहे. येथे एका गँगस्टरची (Gangster) निर्घृण हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. आठ जणांच्या एका टोळीने  या गँगस्टरला भर रस्त्यात ठार करण्यात आलं आहे. चेन्नईच्या बेसिन ब्रिज परिसराजवळ ही धक्कादायक घटना घडली. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव रमेश बाबू असं असल्याचं समजतं आहे. आरोपींनी रमेश बाबू याचा पाठलाग करुन त्याच्यावर कोयत्याने वार केले. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. नंतर काही वेळातच त्याने आपले प्राण सोडले. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

दरम्यान, रमेश बाबू हा देखील गुंड प्रवृत्तीचा होता. त्याच्या नावावर अनेक गुन्हे दाखल होते. त्यामुळे पूर्व वैमनस्यातूनच ही हत्या करण्यात आली. हत्येनंतर आठही आरोपींनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केलं. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की, हल्लेखोर रमेश बाबू याच्या पाठलाग करत होते. त्यानंतर त्यांनी त्याला जमिनीवर पाडलं. त्यानंतर त्यांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी तिथेच काही लहान मुलं देखील खेळत होते. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, गँगस्टर रमेश हा आपल्या घरी जात असतानाच आरोपींनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. दरम्यान, या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, रमेश बाबू याची हत्या पूर्ववैमनस्यातून करण्यात आली आहे. २०१६ मध्ये गँगस्टर शिवराज याची हत्या करण्यात आली होती. त्याचाच बदला घेण्यासाठी आता रमेश बाबू याची हत्या करण्यात आहे. 

मात्र, संपूुर्ण घटनेने चेन्नई पोलिसांवर प्रश्न विचारले जात आहेत. कारण अशाप्रकारे भररस्त्यात हत्या झाल्याने नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दुसरीकडे पोलीस देखील या प्रकरणी आता कसून चौकशी करत आहेत. या हल्ल्या मागचा नेमका सूत्रधार कोण याचा ते शोध घेत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी