आता 'या' भागातील लोकं खाऊ शकणार नाहीत पाणीपुरी, प्रशासनानं घातली पूर्ण बंदी

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 27, 2022 | 20:56 IST

तुमच्या परिसरात पाणीपुरीवर बंदी आली तर? घाबरू नका, हे भारतात नाही तर शेजारच्या नेपाळमध्ये घडले आहे.

थोडं पण कामाचं
  • पाणीपुरी हे नाव ऐकले की एक चटकदार चव मनात येते.
  • तुमच्या परिसरात पाणीपुरीवर बंदी आली तर?
  • आता इथल्या लोकांना पाणीपुरीचा आस्वाद घेता येणार नाही आहे.

 
Panipuri Ban in Nepal:
पाणीपुरी हे नाव ऐकले की एक चटकदार चव मनात येते. या पृथ्वीतलावर क्वचितच कोणी असेल ज्याला पाणीपुरी आवडत नसेल. तुमच्या परिसरात पाणीपुरीवर बंदी आली तर? घाबरू नका, हे भारतात नाही तर शेजारच्या नेपाळमध्ये घडले आहे. नेपाळ सरकारने राजधानी काठमांडू आणि परिसरात पाणीपुरीवर बंदी घातली आहे. आता इथल्या लोकांना पाणीपुरीचा आस्वाद घेता येणार नाही आहे. 

पाणीपुरीच्या पाण्यात सापडले कॉलराचे बॅक्टेरिया!

राजधानी काठमांडूमध्ये पाणीपुरीवर बंदी घालण्याचे कारण कॉलरा सांगण्यात येत आहे. अहवालानुसार, काठमांडूमध्ये कॉलराच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यानंतर स्थानिक प्रशासनाने त्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

काठमांडूमध्ये कॉलराच्या सुमारे 12 रुग्णांची नोंद झाली आहे. याबाबत ललितपूर महानगर प्रशासनाचा दावा आहे की, पाणीपुरीत वापरण्यात येणाऱ्या पाण्यात कॉलराचे बॅक्टेरिया आढळून आले आहेत. यानंतर शहरातील गजबजलेल्या भागात आणि कॉरिडॉर भागात पाणीपुरी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. आरोग्य आणि लोकसंख्या मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आणखी सात जणांना लागण झाल्यानंतर काठमांडूमध्ये कॉलराच्या एकूण रुग्णांची संख्या 12 वर गेली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी