Crime: बलात्कार आणि हत्या... पुन्हा एकदा लखीमपूर खेरी चर्चेत

Lakhimpur Kheri: लखीमपूर खेरी पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पण यावेळी एका दुसऱ्याच भयंकर कारणामुळे हा जिल्हा चर्चेत आला आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तर.

after rape and murder once again lakhimpur kheri in discussion
Crime: बलात्कार आणि हत्या... पुन्हा एकदा लखीमपूर खेरी चर्चेत  |  फोटो सौजन्य: BCCL

उत्तरप्रदेशची राजधानी लखनौपासून 150 किमी अंतरावर असलेला लखीमपूर-खिरी जिल्हा गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत आहे. एकेकाळी शेतकरी आंदोलनाच्या नावाने चर्चेत असलेला हा जिल्हा आता बदाऊनच्या घटनेची आठवण करून देत आहे. (after rape and murder once again lakhimpur kheri in discussion)

बुधवारी दलित समाजातील दोन मुली झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्या होत्या. कुटुंबीयांनी असा आरोप केला होता की, दोन दुचाकीस्वार आले आणि जबरदस्तीने मुलींना घेऊन गेले होते. ज्यानंतर आरोपींनी बलात्कार करून मुलींची हत्या केली. या घटनेनंतर लखीमपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरु केली. लखनौ रेंजचे आयजी लक्ष्मी सिंह देखील घटनास्थळी रवाना झाले आणि सुमारे 24 तासाच्या आत पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली. ज्यामध्ये एका आरोपीला चकमकीत गोळी देखील लागली आहे.

राजकारण तापलं

लखीमपूर खेरी प्रकरणावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. समाजवादी पक्षाने योगी आदित्यनाथ यांच्यावर तर टीकेची झोड उठवली आहे. तर दुसरीकडे दलित समाजाच्या बहिणी आणि मुली सुरक्षित नसल्याचे बसपने म्हटले आहे. पण भाजपने आपल्या सरकारचा बचाव करताना असं म्हटलं आहे की, सरकारचा हेतू समजून घ्या, आपण पाहू शकता की, कशाप्रकारे आरोपींना 24 तासाच्या आत जेरबंद करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी