ज्ञानवापीत काय आढळले, अजय मिश्रा यांचा रिपोर्ट कोर्टात सादर

Ajay Kumar Mishra survey report on Gyanvapi : ज्ञानवापीत काय आढळले या संदर्भात कोर्ट कमिशनर अजय मिश्रा यांनी त्यांचा रिपोर्ट वाराणसी कोर्टाला सादर केला आहे. या रिपोर्टमधील माहिती 'टाइम्स नाउ नवभारत'च्या हाती आली आहे.

Ajay Kumar Mishra survey report on Gyanvapi
ज्ञानवापीत काय आढळले, अजय मिश्रा यांचा रिपोर्ट कोर्टात सादर  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ज्ञानवापीत काय आढळले, अजय मिश्रा यांचा रिपोर्ट कोर्टात सादर
  • अजय मिश्रा यांनी त्यांचा रिपोर्ट बुधवारी रात्री कोर्टाला सादर केला
  • कोर्ट कमिशनर होते अजय मिश्रा

Ajay Kumar Mishra survey report on Gyanvapi : वाराणसी (काशी) : ज्ञानवापीत काय आढळले या संदर्भात कोर्ट कमिशनर अजय मिश्रा यांनी त्यांचा रिपोर्ट वाराणसी कोर्टाला सादर केला आहे. या रिपोर्टमधील माहिती 'टाइम्स नाउ नवभारत'च्या हाती आली आहे. ही माहिती प्रेक्षकांसाठी जाहीर करत आहोत...

अजय मिश्रा यांनी त्यांचा रिपोर्ट बुधवारी रात्री कोर्टाला सादर केला. अजय मिश्र ६ मे आणि ७ मे रोजी झालेल्या सर्व्हेत तसेच १४ ते १६ मे दरम्यान झालेल्या सर्व्हेत सहभागी होते. कोर्टाने ६ आणि ७ मे रोजी केलेल्या सर्व्हेसाठी अजय मिश्रा हे एकच कोर्ट कमिशनर होते. पण १४ ते १६ मे दरम्यान झालेल्या सर्व्हेत अजय मिश्रा, विशाल सिंह आणि सोहनलाल आर्य हे तिघे कोर्ट कमिशनर होते. 

अजय मिश्र यांच्या रिपोर्टनुसार मंदिरात ज्या पद्धतीची रचना, सौंदर्यवृद्धीसाठीची कलाकुसर असते तसेच ज्ञानवापीत आढळले. ज्ञानवापीत शिलापट्ट (शिलापट्टी) आढळले. आयताकृती दगडी पट्टीवर केलेले कोरीव काम हे शिलापट्ट किंवा शिलापट्टी म्हणून ओळखले जाते. शिलापट्टीवर शेषनाग, फणा काढलेला नाग, कमळ अशा आकृत्या आढळल्या.

अजय मिश्रा यांच्या रिपोर्टमधील महत्त्वाच्या बाबी...

शिलापट्टवर (शिलापट्टीवर) शेषनाग, फणा काढलेला नाग, कमळ अशा आकृत्या
उत्तर पश्चिम कोपऱ्यात नवे बांधकाम केल्याचे दिसते
शिलापट्टवर (शिलापट्टीवर) शेंदूराच्या रंगात रंगवलेल्या कलाकृती
देवतांच्या मूर्तींच्या (देव विग्रह) रुपातील कलाकृती
व्हिडीओग्राफीत रिपोर्टमध्ये नमूद माहिती स्पष्ट दिसते
शिलापट्टवर (शिलापट्टीवर) चार मूर्तींची आकृती
चौथी आकृती मूर्तीसारखी दिसते

हिंदू सेनेचा युक्तीवाद

ज्ञानवापी या विषयात निर्णय घेताना इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. ज्ञानवापी प्रकरणी प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट १९९१ अर्थात पूजास्थळ कायदा (पूजास्थळ अधिनियम) लागू होत नाही. कारण विश्वनाथ-ज्ञानवापी वाद स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे; असा युक्तीवाद हिंदू सेना यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला. आता या प्रकरणी अंजुमन इंतेजामिया त्यांचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयात मांडणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी