चीनसोबत सीमावाद सुरू असताना झाला मोठा निर्णय, भारत खरेदी करणार Su-30MKI, MiG-29 लढाऊ विमाने

India to acquire new fighter aircraft from russia: चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या दरम्यान भारताच्या संरक्षण मंत्रालयाने लढाऊ विमाने खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे भारताची संरक्षण व्यवस्था आणखी मजबूत

amid india china border tension defence ministry approves proposal to acquire 33 new fighter aircraft from russia including 12 su-30MIi and mig 29
प्रातिनिधीक फोटो 

थोडं पण कामाचं

  • भारत सुखोई-३० आणि मिग-२९ ही लढाऊ विमाने खरेदी करणार 
  • भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने खरेदीच्या प्रस्तावांना दिली मान्यता 
  • हा निर्णय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेत्रृत्वात डीएससीच्या बैठकीत घेण्यात आला 

नवी दिल्ली: चीनसोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ तणाव निर्माण झाला असताना आथा भारत सरकारने (Indian Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने (Defence Acquisition Council) लढाऊ विमानांच्या खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. डीएसीने १२ सुखोई-३० (Su-30MKI) आणि २१ मिग-२९ (MiG 29) ही लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यासोबतच सध्या असलेल्या ५९ मिग-२९ विमानांच्या अपग्रेडेशनला मान्यता दिली आहे.  संरक्षणंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या अध्यक्षतेखाली डीएसीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे भारतीय संरक्षण यंत्रणा आणखी मजबूत होणार आहे आणि त्यासोबतच हवाई दलाची ताकदही वाढणार आहे.

हवाई दलात फायटर स्क्वाड्रन 

रशियाकडून मिग-२९ विमानांची खरेदी आणि सध्याच्या विमानांचे अपग्रेडेशन या सर्वांसाठी ७४१८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर, सुखोई-३० एमकेआयच्या खरेदीसाठी हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडून खरेदी केली जाणार आहे. याचा खर्च जवळपास १०७३० कोटी रुपयांच्या आसपास असेल. हा निर्णय भारतीय वायुसेना (IAF) मध्ये लढाऊ स्क्वाड्रनची वाढती मागणी लक्षात घेत करण्यात आला आहे.

मिसाइल खरेदीसाठी मान्यता 

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेला मोठ्या ताकदीने विकसित केलेल्या दूर अंतरावरील हवाई मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या खरेदीला संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली आहे. या क्षेपणास्ताराचा हवाई दल आणि नौदलाला सुद्धा फायदा होणार आहे. डीएसीच्या बैठकीत या संदर्भात ३८,९०० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

MSMEच्या भागीदारीने संरक्षण उपकरणांची निर्मिती 

आत्मनिर्भर भारत या अंतर्गत भारतातील संरक्षण उपकरणे एमएसएमईच्या मदतीने तयार केली जाणार आहेत. यामध्ये दारूगोळा, बीएमपी आयुध अपग्रेड्स, सॉफ्टवेअर डिफाइन रेडिओ, लाँग रेंज लँड अटॅक क्रूझ मिसाईल सिस्टम, नौदल आणि हवाई दलासाठी अस्त्र क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी