Amol Kolhe संसदेत बोलायला उभे राहिले अन् माईकच केला बंद!

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 08, 2022 | 16:15 IST

Amol Kolhe parliament Mic Off : शिवाजी महाराजांबद्द वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा संसदेत मांडण्यासाठी उभ्या राहिलेल्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंचा पीठासीन अधिकाऱ्यांनी माईक बंद केला.

थोडं पण कामाचं
  • छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये
  • अमोल कोल्हे यांचा माईक बंद करण्यात आला
  • अपमानकारक वक्तव्यावर कायदा करण्याची मागणी

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्याचा मुद्दा मांडण्यासाठी उभ्या राहिलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा आज माईक बंद करण्यात आला. त्यानंतर कोल्हे चांगलेच संतापले. (Amol Kolhen's mic is muted)

अधिक वाचा : Bhagat Singh koshyari यांच्या विरोधात शिवसेनेची संसदेच्या आवारात निदर्शने

संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील दुसऱ्या दिवशी शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली. पहिल्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर तो कामकाजातून काढण्यात आला. त्यानंतर दोन्ही पक्षातील खासदारांनी संसदेच्या आवारात निदर्शने केली. आज राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्या करण्यावर कायदा करण्याचा मुद्दा मांडताच पीठासीन अधिकारांनी खासदार अमोल कोल्हे यांचा माईक बंद करण्यात आला.

अधिक वाचा : फडणवीसांची नजर काँग्रेसच्या युवा नेत्यावर! बाळासाहेब थोरातांसमोरच दिली भाजपची ऑफर

या घटनेनंतर सभागृहाच्या  बाहेर येताच कोल्हेंनी संताप व्यक्त केला. आमचा माईक बंद केला तरी आमच्या भावना आणि आमचा आवाज तुम्ही कदापि बंद करु शकणार नाही. तो कानठळ्या बसवूनच राहिन असा इशारा कोल्हे यांनी थेट संसदेबाहेरुनच दिला.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी