तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, त्यांच्यामुळे मी जिवंत भटिंडा विमानतळावर परतलो - मोदी

Apne CM ko thanks kehna, ki mein Bhatinda airport tak zinda laut paaya, PM Modi told airport officials : भटिंडा विमानतळावरुन दिल्लीला परत जाताना स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना उद्देशून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक सूचक वक्तव्य केले. 'तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, त्यांच्यामुळे मी जिवंत भटिंडा विमानतळावर परतलो ( अपने सीएम को थैंक्स कहना, मैं भटिंडा एयरपोर्ट तक जिंदा लौट पाया )'; असे पंतप्रधान म्हणाले.

Apne CM ko thanks kehna, ki mein Bhatinda airport tak zinda laut paaya, PM Modi told airport officials
तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, त्यांच्यामुळे मी जिवंत भटिंडा विमानतळावर परतलो - मोदी 
थोडं पण कामाचं
  • तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, त्यांच्यामुळे मी जिवंत भटिंडा विमानतळावर परतलो - मोदी
  • पंतप्रधानांनी सूचक वक्तव्य करण्याआधी पंजाबमध्ये एक धक्कादायक घटना घडली
  • पंतप्रधानांचा दौरा सुरू असताना संरक्षण व्यवस्थेत गंभीर स्वरुपाची त्रुटी आढळली

Apne CM ko thanks kehna, ki mein Bhatinda airport tak zinda laut paaya, PM Modi told airport officials : नवी दिल्ली : पंजाब दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार ५ जानेवारी २०२२ रोजी भटिंडा विमानतळावर उतरले. काही तासांनी भटिंडा विमानतळावरुन दिल्लीला परत जाताना स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना उद्देशून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक सूचक वक्तव्य केले. 'तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, त्यांच्यामुळे मी जिवंत भटिंडा विमानतळावर परतलो ( अपने सीएम को थैंक्स कहना, मैं भटिंडा एयरपोर्ट तक जिंदा लौट पाया )'; असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी हे वक्तव्य करण्याआधी पंजाबमध्ये एक धक्कादायक घटना घडली.

पंतप्रधानांचा दौरा सुरू असताना संरक्षण व्यवस्थेत गंभीर स्वरुपाची त्रुटी आढळली. ही परिस्थिती पंतप्रधानांचे संरक्षण करणाऱ्या केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या चुकीमुळे नाही तर स्थानिक पोलिसांच्या हलगर्जीपणातून निर्माण झाली. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भटिंडा विमानतळावरुन फिरोझपूर जिल्ह्यातील हुसैनीवाला येथे हुतात्मा स्मारकाला भेट देण्यासाठी जाणार होते. विमानतळापासून जेमतेम १०० किमी अंतरावर असलेल्या हुतात्मा स्मारकाला भेट देण्यासाठी पंतप्रधान विशेष हेलिकॉप्टरने जाणार होते. पण खराब हवामानामुळे दृश्यमानता कमी झाली होती. काही दिवसांपूर्वीच सीडीएस रावत यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. यामुळे धोका टाळण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना रस्ते मार्गाने दोन तासांचा प्रवास करुन हुतात्मा स्मारकापर्यंत नेण्याचा निर्णय सुरक्षा यंत्रणेने घेतला. 

सुरक्षा व्यवस्थेच्या संकेतांनुसार पंजाब पोलिसांना पंतप्रधानांच्या सुधारित कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. पोलिसांकडून परवानगी मिळाल्यानंतर ताफा स्मारकाच्या दिशेने निघाला. नियमानुसार पंतप्रधानांच्या वाहनांच्या ताफ्यासाठी रस्ता मोकळा करणे आणि सुरक्षित ठेवणे ही स्थानिक पोलिसांची जबाबदारी होती. पण त्यांच्याकडून जबाबदारीचे पालन करण्यात हलगर्जीपणा झाल्याचे प्रथमदर्शनी आढळले.

हुसैनीवालाच्या हुतात्मा स्मारकापासून सुमारे ३० किमी अंतरावर एका उड्डाणपुलावरुन पंतप्रधानांचा ताफा जात असताना शेतकऱ्यांच्या एका गटाने आंदोलन करत ताफा अडवला. आंदोलक पंतप्रधान मोदी यांच्या वाहनांच्या दिशेने येऊ लागले. उड्डाणपूल चढून आंदोलक येत आहेत; हे लक्षात येताच वाहनांचा ताफा जिथल्या तिथे थांबला. सुरक्षा रक्षकांनी पंतप्रधान मोदी असलेल्या वाहनाला चहूबाजूने घेरले. पुढील १५-२० मिनिटे ही परिस्थिती कायम होती. सुदैवाने या दरम्यान कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही.

पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर अडकला असताना सुरक्षा रक्षकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला. पण मुख्यमंत्र्यांनी फोन घेणे टाळले. हा प्रकार अतिशय संशयास्पद होता. यामुळे सावध झालेल्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा अंदाज घेतला आणि योग्यवेळी कडेकोट बंदोबस्तात पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा भटिंडा विमानतळाच्या दिशेने परत वळवला. 

नियोजीत कार्यक्रमानुसार पंतप्रधान हुतात्मा स्मारकाला भेट दिल्यानंतर चंदिगडच्या पीजीआयएमइआरच्या एका उपकेंद्रासह दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेस वे तसेच इतर विकास योजनांचे भूमिपूजन करणार होते. पंतप्रधान मोदींच्या हस्ते ४२ हजार ७५० कोटी रुपयांच्या विकास योजनांचे भूमिपूजन (शिलान्यास) होणार होते. या नंतर पंतप्रधान फिरोजपूरमध्ये एक सभा घेणार होते. पण संरक्षणाशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे पंतप्रधान मोदी यांना पंजाबमधील दौरा रद्द करुन परत जावे लागले. परत जाताना पंतप्रधानांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना उद्देशून सूचक वक्तव्य केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी