Heart Touching Video: मुलीनं राखी बांधताच जवानानं कौतुकास्पद कृत्य, व्हिडिओवर कंमेंट्सचा वर्षाव

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Aug 13, 2022 | 15:36 IST

Raksha bandhan Video: रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणींच्या रक्षणाची शपथ घेतात. तर, बहिणी आपल्या भावाला संरक्षणाचा धागा बांधतात आणि त्याला दीर्घायुष्याची शुभेच्छा देतात. सध्या सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Rakshabandhan Video
रक्षाबंधन २०२२ 
थोडं पण कामाचं
  • दरवर्षी श्रावण (Shravan) महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला देशभरात रक्षाबंधनाचा (Raksha bandhan) सण साजरा केला जातो.
  • यंदा भद्राकाल असल्याने 11 तारखेव्यतिरिक्त देशभरात 12 ऑगस्टला राखी साजरी केली गेली.
  • रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाला रक्षणाचा धागा बांधतात आणि त्याला दीर्घायुष्याची शुभेच्छा देतात.

नवी दिल्ली:  Raksha bandhan Viral Video: दरवर्षी श्रावण (Shravan)  महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला देशभरात रक्षाबंधनाचा (Raksha bandhan) सण साजरा केला जातो. हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असतो. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाला रक्षणाचा धागा बांधतात आणि त्याला दीर्घायुष्याची शुभेच्छा देतात. त्याच वेळी भाऊ आपल्या बहिणींच्या रक्षणाचे संकल्प करतात. यंदा भद्राकाल असल्याने 11 तारखेव्यतिरिक्त देशभरात 12 ऑगस्टला राखी साजरी केली गेली.

लष्कराच्या जवानाने मुलीच्या पायाला केला स्पर्श

रक्षाबंधनाशी संबंधित सर्व प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर एका व्हिडिओने मनात चांगलीच जागा केली आहे. हा व्हिडिओ लष्करातील जवान आणि एका मुलीशी संबंधित आहे. 

अधिक वाचा-  श्रीवास्तव कुटुंबीय चिंतेत, दोन्ही भाऊ AIIMS मध्ये दाखल; एक आयसीयूत तर दुसरा ऑपरेशन थिएटरमध्ये

व्हिडिओमध्ये एक मुलगी लष्कराच्या जवानाला राखी बांधताना दिसत आहे. त्याचवेळी जवान आधी मुलीला पैसे देतात. यानंतर, ते खाली वाकतात आणि मुलीच्या पायाला स्पर्श करतात. हा व्हिडिओनं लोकांचं मन जिंकलं आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक लष्कराच्या जवानाचे जोरदार कौतुक करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी