अशाप्रकारे अर्णबने BARC वर बनवली होती आपली पकड, WhatsApp चॅटवरुन धक्कादायक खुलासे 

TRP Scam: अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांनी केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून बरेच धक्कादायक खुलासे झाले आहेत.

arnab goswami whatsapp chat
अशाप्रकारे अर्णबने BARC वर बनवली होती आपली पकड, WhatsApp चॅटवरुन धक्कादायक खुलासे   |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली: टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (TRP) प्रकरण एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. खरं तर रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि दूरदर्शन रेटिंग एजन्सी BARC माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट्स व्हायरल झाल्या आहेत. यामुळे अनेक मोठे खुलासे झाले आहेत. अर्णब गोस्वामीच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवर टीआरपीची कशी छेडछाड केली गेली हे समोर आले आहे.

अर्णब आणि पार्थो यांच्या चॅटमध्ये असे दिसते की अर्णबने BARCचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांची वकिली केली होती. यापूर्वी मुंबई पोलिसांनी सांगितले की, दासगुप्ताने रिपब्लिक टीव्हीची दर्शकसंख्या वाढविण्यास  काही फेरफार करण्यास मदत केली होती. चॅटमधून असे कळते की अर्णबने प्रसार भारतीचे प्रमुख शशी शेखर वेम्पती यांच्याशी देखील संपर्क केला होता. कारण की, त्याला आपला मित्र पार्थोच्या कार्यकाळात वाढ व्हावी यासाठी त्यांची मदत हवी होती. ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की वेम्पती बार्कच्या बोर्डावर दूरदर्शनचे प्रतिनिधित्व करतात.

अर्णब आणि पार्थो दासगुप्ताच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरुन खुलासा झाला आहे की, टीआरपीमध्ये फेरफार करुन रिपब्लिक चॅनलला पहिल्या क्रमांकावर टाकण्यात आले आणि टाइम्स नाऊ चॅनलला दुसर्‍या क्रमांकावर टाकण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते. हे दोघेही एकमेकांना फायदा पोहचविण्यासाठी आपआपले काम करुन घेत असल्याचे चॅटवरून स्पष्ट झाले आहे. पार्थो एका ठिकाणी सांगतात, तुम्ही पीएमओमध्ये माध्यम सल्लागारासारखे पद मिळविण्यात मदत करू शकता का? चॅटमधून असे कळले आहे की, पीएमओमध्ये असणाऱ्या ओळखीचा फायदा अर्णब घेत आहे. अर्णबने याच ओळखीचा फायदा उचलून बार्कवरील आपली पकड पक्की केली होती आणि   टीआरपीमध्ये फेरफार करुन आपल्या चॅनेलला फायदा पोहचवला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी