ओवेसींचा भाजपवर पुन्हा निशाणा, मुस्लिम समाजाला खैरात नको हक्क द्या

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 10, 2019 | 10:26 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांच्या मते मुस्लिम समाजाला कोणत्याही प्रकारच्या मदतीची गरज नाही आहे. त्यांना त्यांचा हक्क हव आहे. भाजपला समजायला हवे की ते कोणत्याही स्थानिक पक्षाला इतक्या सहजतेने घेऊ शकत नाही.

asaduddin owaisi
असदुद्दीन ओवेसी 

मुंबई: एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या म्हणण्यानुसार १९४७मध्ये जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाच हा विचार होता की आमच्यासमोर नवा भारत आहे. तो स्वतंत्र भारत असेल. महात्मा गांधी, नेहरू आणि आंबेडकरांचे विचार होते की भारतात प्रत्येकाचे विचार जाणून घेतले जातील. आम्हाला आशा की मुस्लिमांना देशात त्यांचे योग्य प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाले. आम्हाला कोणाची मदत नको. मुस्लिम समाज कोणच्याही मदतीवर जगू इच्छित नाही. 

भाजपवर निशाणा साधताना ओवेसी म्हणाले, तुम्ही काँग्रेस अथवा दुसऱ्या धर्मनिरपेक्षक ताकदींना सोडू शकत नाहीत. तुम्ही लक्षात ठेवा की काँग्रेस वा इतर धर्मनिरपेक्ष संघांना कमी समजू शकत नाही. तुम्हाला वाटते की त्यांनी खूप मेहनत केली नाही. मात्र भाजपचे कुठे नुकसान झाले आहे. जर पंजाबबाबत बोलायचे झाल्यास तिथे शीख समाज होता. भाजपला दुसऱ्या जागांवर पराजयचा सामना का करावा लागला. जर भाजपची हिंदी बेल्ट सोडून कुठे पराजय झाला तर तो काँग्रेसमुळे नव्हे तर इतर स्थानिक पक्षांमुळे 

 

 

जर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींबाबत बोलायचे झाल्यास ते अमेठीत निवडणूक हरले. मात्र वायनाडमध्ये त्यांना विजय मिळाला. त्यामुळे असं नाही की तिथे ४० टक्क्याहून अधिक मुस्लिम समाज आहे. ओवेसी म्हणाले अधिकतर राजकीय पक्ष मुस्लिमांना केवळ व्होट बँक म्हणून पाहिले जाते. आज जेव्हा आम्ही २१व्या शतकाच्या दुसऱ्या शतकात आहोत तर आपल्याला हा विचार करावा लागेल की विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कसे पुढे जाऊ शकतो. 

काही दिवसांपूर्वी ओवेसी यांनी आक्रमक विधान केले होते. भाजपा देशात पुन्हा सत्ता मिळाल्याने त्यांना घाबरून जाण्याची गरज नाही. पंतप्रधान मंदिरात जाऊन पुजा करत असतील तर मुस्लिमांनाही मशिदीत जाऊन बिनधास्तपणे नमाज पठण करण्याचा अधिकार आहे. मोदी गुहेत बसून ध्यान करू शकतात तर मुस्लिम मशीदीत जाऊन बिनदिक्कतपणे नमाज पठण करू शकतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
ओवेसींचा भाजपवर पुन्हा निशाणा, मुस्लिम समाजाला खैरात नको हक्क द्या Description: एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांच्या मते मुस्लिम समाजाला कोणत्याही प्रकारच्या मदतीची गरज नाही आहे. त्यांना त्यांचा हक्क हव आहे. भाजपला समजायला हवे की ते कोणत्याही स्थानिक पक्षाला इतक्या सहजतेने घेऊ शकत नाही.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles