मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ला, कर्नलसह ७ जणांचा मृत्यू

Assam Rifles CO, his family members, 4 jawans killed in terror ambush in Manipur सिनघाट सब-डिव्हिजनमध्ये '४६ आसाम रायफल्स'वर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी यांना  वीरमरण आले. कर्नल त्रिपाठी यांच्या व्यतिरिक्त आणखी ४ जवानांना वीरमरण आले. कमांडिगं ऑफिसरची पत्नी आणि मुलगा यांचाही मृत्यू झाला.

Assam Rifles CO, his family members, 4 jawans killed in terror ambush in Manipur
मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ला, कर्नलसह ७ जणांचा मृत्यू 
थोडं पण कामाचं
  • मणिपूरमध्ये 'आसाम रायफल्स'वर दहशतवादी हल्ला
  • कर्नल आणि चार सैनिकांना वीरमरण
  • दहशतवाद्यांचा शोध सुरू

Assam Rifles CO, his family members, 4 jawans killed in terror ambush in Manipur । चुराचांदपुर: मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यातल्या सिनघाट सब-डिव्हिजनमध्ये '४६ आसाम रायफल्स'वर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी यांना  वीरमरण आले. कर्नल त्रिपाठी यांच्या व्यतिरिक्त आणखी चार जवानांना वीरमरण आले. कमांडिगं ऑफिसरची पत्नी आणि मुलगा यांचाही मृत्यू झाला. घटनास्थळाभोवतालच्या मोठ्या परिसराला 'आसाम रायफल्स'ने घेराव घातला आहे. दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

'४६ आसाम रायफल्स'वर झालेल्या हल्ल्यात पीपल्स लिबरेशन आर्मीचा हात असल्याचे समजते. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनेने घेतलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयईडी स्फोट करुन सैनिकांवर हल्ला करण्यात आला.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी ट्वीट करुन घटनेची माहिती दिली. दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा मुख्यमंत्र्यांनी जाहीर निषेध केला. दोषींना शोधून काढू आणि त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू; असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मणिपूरमध्ये आसाम रायफल्स तसेच निमलष्करी दलाचे जवान दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही मणिपूरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी