काबूल: Ayman al-Zawahiri killed: काबूलमध्ये (Kabul) अमेरिकेने ड्रोन हल्ला (Drone Attack) केला. या हल्ल्यात अल कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी ठार झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जवाहिरीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. दरम्यान, अमेरिकेतील एका अधिकाऱ्याने या कारवाईबाबत माहिती दिली आहे.
31 जुलै रोजी ड्रोन ऑपरेशनमध्ये जवाहिरी मारला गेल्याचे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. बायडेन यांनी 25 जुलै रोजी मारण्याची परवानगी दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, ड्रोन हल्ल्याच्या वेळी जवाहिरी काबूलमधील त्यांच्या घराच्या बाल्कनीत उभा होता.
अधिक वाचा- पालकांनो मुलांची काळजी घ्या; मुंबई, ठाण्यात पसरतोय 'हा' संसर्ग
आपल्या काबूलच्या घरातून बाहेर पडत नव्हता दहशतवादी
असं म्हटलं जातं की, दहशतवादी काबूलमधलं घर सोडत नव्हता. ड्रोनने हल्ला केला तेव्हा अल जवाहिरीचे कुटुंबीयही घरात उपस्थित होते. या हल्ल्यात एकाही नागरिकाचा मृत्यू झाला नसल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितले. या हल्ल्यात घराच्या खिडकीचे नुकसान झाले. अल जवाहिरीला टार्ग्रेट करत ड्रोनमधून दोन हेल फायर क्षेपणास्त्रे डागण्यात आली.
जवाहिरीला ठार करण्यासाठी अमेरिकेने 2011 प्रमाणे यावेळी कमांडो ऑपरेशन केले नाही. पाकिस्तानातील ऐबटाबादमध्ये लपलेला अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला ठार करण्यासाठी अमेरिकेने कमांडो ऑपरेशन सुरू केले होते. नेव्ही सील कमांडोंनी हेलिकॉप्टरने ऐबटाबादला जाऊन 2 मे 2011 रोजी लादेनला ठार केले, मात्र अमेरिकेने जवाहिरीला मारण्यासाठी ड्रोनची मदत घेतली.
अमेरिकेच्या हिटलिस्टवर होता अल जवाहिरी
अमेरिकेतील 9/11 च्या हल्ल्यात जवाहिरीची मोठी भूमिका होती. हल्ल्याच्या नियोजनात तो लादेनचा महत्त्वाचा सहयोगी होता. लादेनचा डेप्युटी म्हणून त्याने अनेक दहशतवादी हल्ल्यांचा कट रचले होते. 9/11 पासून जवाहिरी अमेरिकेच्या हिटलिस्टवर होता पण तो टिकून राहिला.
अधिक वाचा- जवाहिरीनंतर आता 'या' दहशतवाद्याच्या शोधात अमेरिका, कोट्यवधींचं बक्षीस देखील जाहीर
राष्ट्राला संबोधित करताना बायडेन म्हणाले की, अल-कायदाचा नेता अल-जवाहिरी मारला गेला आहे. लादेनचा सुभेदार असताना त्याने अमेरिकेत दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. 9/11 च्या हल्ल्यात सुमारे तीन हजार अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता.