UP ते US बाबाच्या बुलडोझरची धूम

Tiranga Yatra Viral Video: सोशल मीडियावर तिरंगा यात्रेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बाबाचा बुलडोझर दिसत आहे.

baba bulldozer from up to us bjp poster back and forth in tricolor journey
UP ते US बाबाच्या बुलडोझरची धूम 

Tiranga Yatra Viral Video: न्यू जर्सी (अमेरिका): यंदाचा स्वातंत्र्यदिन खूप खास होता. कारण, 76व्या स्वातंत्र्यदिनी देशाने स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा केला. यादरम्यान देशातच नव्हे तर परदेशातही तिरंगा यात्रा काढण्यात आली. तिरंगा यात्रेसंदर्भात एकामागून एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहेत. पण, अमेरिकेतून एक व्हिडिओ समोर आला आहे, जो खूपत व्हायरल झाला आहे. (baba bulldozer from up to us bjp poster back and forth in tricolor journey )

कारण, या व्हिडिओमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोझरची धूम दिसत होती. खरं तर, अमेरिकेतील न्यू जर्सी येथील अॅडिशन टाऊनशिपमध्ये भारतीय वंशाच्या लोकांनी बुलडोझरने फेरफटका मारून स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला. 

तिरंगा यात्रेदरम्यान लोक भाजपचे पोस्टर घेऊन पुढे जात होते. त्याचवेळी बुलडोझर मागे होता, त्यावर बाबा का बुलडोझर असे लिहिले होते. इतकंच नाही तर सीएम योगी झिंदाबाद आणि बुलडोझर बाबा झिंदाबादच्या घोषणांनी न्यू जर्सी दुमदुमली. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तुम्ही पण पाहा हा व्हिडिओ.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी