धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून तरुणीची दिवसाढवळ्या गोळी मारून हत्या

Ballabhgarh Nikita Tomar murder case: बल्लभगढ येथे काल एका विद्यार्थिनीची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

Ballabhgarh incident A case of kidnapping of Nikita Tomar was also registered in 2018
धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून तरुणीची दिवसाढवळ्या गोळी मारून   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • नवी दिल्लीला लागून असलेल्या हरयाणामधील बल्लभगड येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.
  • बल्लभगढ येथे काल एका विद्यार्थिनीची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
  • मृत विद्यार्थीनी पेपर देऊन महाविद्यालयातून बाहेर आली. तिच्यावर गोळ्या झाडून मारेकरी बिनदिक्कत गाडीतून पळून गेले.

फरिदाबाद :  नवी दिल्लीला लागून असलेल्या हरयाणामधील बल्लभगड येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बल्लभगढ येथे काल एका विद्यार्थिनीची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मृत विद्यार्थीनी पेपर देऊन महाविद्यालयातून बाहेर आली. तिच्यावर गोळ्या झाडून मारेकरी बिनदिक्कत गाडीतून पळून गेले. तेथे बरेच लोक उपस्थित होते. पण मारेकर्‍यांना रोखण्याची प्रयत्न कोणीच केली नाही. दरम्यान, मृत्यूचे हे तांडव सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

या सीसीटीव्हीत एक मुलगा एका मुलीला जबरदस्तीने पांढऱ्या गाडीत बसण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मुलगी त्याच्या हात झडकून आपल्या मैत्रिणीच्या मागे लपण्याच्या प्रयत्न करते, त्यानंतर मुलगा पिस्तूल बाहेर काढून मुलीवर गोळी झाडत असल्याचे चित्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. 

मृत विद्यार्थिनी बीकॉम अंतिम वर्षाला होती आणि बल्लभगडच्या अग्रवाल महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी आली होती. परीक्षा देऊन ती बाहेर पडली, तेव्हा आय -20 कारमधील एका युवकाने तिला जबरदस्तीने कारमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. मुलीने गाडीत बसण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्यावर गोळ्या घालून पळ काढला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मृत मुलीचे नाव निकिता आहे.

निकिताच्या वडिलांनी माहिती दिली की, तौफिक नावाच्या तरुणाने निकितासोबत बारावीपर्यंत शिक्षण घेतले होते. मैत्री करण्यासाठी तो तिच्यावर दबाव आणत होता. मात्र, निकिताने त्याला नकार दिला. आरोपींनी २०१८ मध्ये निकिताचे अपहरणही केले होते, मात्र स्थानिकांनी तिची सुटका केली होती. पोलिसांनी विद्यार्थिनीचा भाऊ नवीन याच्या तक्रारीवरून तौफिकविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी