नवी दिल्लीः भारतीय लष्करानं पाकिस्तान (Pakistan) ची BAT च्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. लष्कराच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 12-13 सप्टेंबर 2019ला पाकिस्तानच्या BAT (बॉर्डर अॅक्शन टीम)नं एलओसी (LoC)जवळ घुसखोरीचा प्रयत्न केला आणि भारतीय लष्करानं (Indian Army)नं तो प्रयत्न उधळून लावला. या घुसखोरीचा व्हिडिओ समोर आला आहे. 12-13 सप्टेंबरला पाकिस्तानकडून हाजीपूर सेक्टरमध्ये हा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. यात भारतीय सैन्यांनी पाकच्या एसएसजी (स्पेशल सर्व्हिस ग्रुप) कंमाडो/ दहशतवाद्यांवर अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चरला मारा केला. या व्हिडिओ बघू शकता की, भारतीय लष्करानं ग्रेनेड हल्ले करून त्यांचा खात्मा केला. सुत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्य घुसखोरीसाठी दहशतवाद्यांची मदत करत आहे.
तसंच लष्करी सुत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानची बीएटीद्वारे ही घुसखोरी किंवा घुसखोरीचा प्रयत्न 12-13 सप्टेंबर, 2019 ला पीओकेच्या हाजीपूर सेक्टरमध्ये करण्यात येत होता आणि तो प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे. वारंवार नकार करून देऊनही पाकिस्तान भारतात दहशतवाद्यांना प्रवेश करून देण्याचा प्रयत्न करत आहे. ऑगस्टमध्ये भारतीय लष्करानं एलओसीवर पाकिस्तानद्वारे करण्यात आलेले 15 घुसखोरीचे प्रयत्न उधळून लावले.