[VIDEO]: भारतीय सैन्याची मोठी करावाई, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Batote operation: जम्मू-काश्मीरमधील बटोट-डोडा महामार्गावर दहशतवाद्यांनी एका कुटुंबाला ओलीस ठेवले होते. याची माहिती मिळताच भारतीय सैन्याने कारवाई करत या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

batote operation jammu kashmir 3 terrorists killed army personnel martyrd india news
[VIDEO]: भारतीय सैन्याची मोठी करावाई, तीन दहशतवाद्यांचा खात्मा  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्य दलाची मोठी कारवाई
  • तीन दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याकडून खात्मा
  • दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या व्यक्तीची सैन्य जवानांनी केली सुटका

जम्मू-काश्मीर: जम्मूमधील रामबन जिल्ह्यातील बटोट परिसरात भारतीय सैन्य दलाने कारवाई करत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांनी एका व्यक्तीला ओलीस ठेवले होते. या कुटुंबाची भारतीय सैन्य दलाने सुरक्षित सुटका केली असून दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. जम्मूचे पोलीस आयजी मुकेश सिंह यांनी बटोट चकमकी प्रकरणी माहिती दिली की, दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या नागरिकाची सुटका केली आहे. दहशतवाद्यांसोबत झालेल्या या चकमकीत भारतीय सैन्य दलाचा एक जवान शहीद झाला आहे तर अन्य दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.

जम्मू-काश्मीर मधील रामबन जिल्ह्यात शनिवारी सकाळी बटोट-डोडा राज्य महामार्गावर दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. बटोट येथे दोन संशयित दहशतवाद्यांनी महामार्गावर एका गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र, सतर्क गाडी चालकाने गाडी थांबवली नाही. तसेच या वाहन चालकाने या घटनेची संपूर्ण माहिती तात्काळ क्यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम)ला दिली. 

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्य दलाने केलेल्या कारवाईनंतर भारतीय सैन्य दलाच्या जवानांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत भारतीय सैन्य दलाचे अधिकारी सेलिब्रेशन करताना दिसत आहेत.

जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी ट्विट करत माहिती दिली की, जम्मूमधील रामबन जिल्ह्यातील बटोट परिसरात पाच दहशतवाद्यांना घेरण्यात आलं आहे. पोलीस, सैन्य दल आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त दलाने दहशतवादी लपलेल्या भागाला घेरलं आहे. दोन्ही बाजुंनी गोळीबार सुरु आहे. दहशतवाद्यांनी सकाळी सुरक्षा दलावर गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी बटोट शहरात एका नागरिकाच्या घरात प्रवेश केला त्यानंतर भारतीय सैन्याने या घाराला घेरलं. 

दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकत सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या नंतर भारतीय सैन्य दलाचे जवान, पोलिसांनी परिसराला घेराव घालत कारवाई सुरु केली आणि तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात जम्मू-काश्मीर परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी