Exclusive: भारत माता की जय... अटारी बॉर्डर दणाणली, जाणून घ्या काय असतं बीटिंग रिट्रीट

Attari Border: अटारी-वाघा सीमेवर बीटिंग रिट्रीट सोहळा आज पार पडला. यावेळी जवानांचा उत्साह पाहण्यासारखा होता. सीमेवर भारत-पाकिस्तानच्या सैनिकांच्या शौर्याचे इथे खऱ्या अर्थाने दर्शन घडते. जाणून घ्या बीटिंग द रिट्रीट सेरेमनी म्हणजे काय?

beating retreat ceremony at attari wagah border indian army personnel and indians in enthusiasm chanting bharat mata ki jai
अटारी बॉर्डर दणाणली, जाणून घ्या काय असतं बीटिंग रिट्रीट  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला अटारी-वाघा सीमेवर बीटिंग रिट्रीट सोहळा साजरा केला जातो.
  • येथे दोन्ही देशांचे राष्ट्रध्वज संध्याकाळ होण्याआधी खाली उतरवले जातात.
  • बराकीतील सैन्य मागे घेण्याचे प्रतीक म्हणून ही परंपरा आहे.

Beating the Retreat: 15 ऑगस्टच्या (15th August) खास क्षणी भारत-पाकिस्तान सीमेवर (india-pakistan border) असणाऱ्या अटारी बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट (Beating the Retreat) सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये बीएसएफचे (BSF) जवान पूर्ण तयारीने सहभागी झाले होते. या खास कार्यक्रमासाठी लोक आधीच येथे पोहोचले होते. यावेळी लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. बीटिंग रिट्रीट सोहळा 15 ऑगस्ट-26 जानेवारी रोजी अटारी-वाघा सीमेवर साजरा केला जातो. यामध्ये बीएसएफ आणि पाक रेंजर्सचा सहभाग असतो. (beating retreat ceremony at attari wagah border indian army personnel and indians in enthusiasm chanting bharat mata ki jai)

समारंभात बीएसएफचे जवान तिरंगा उतरवतात. यावेळी सीमेवर भारत-पाकिस्तानच्या सैनिकांच्या शौर्याचे दर्शन घडते. दररोज संध्याकाळी दोन्ही देशांचे जवान ही कवायत करतात. सैनिकांच्या शक्तिप्रदर्शनामुळे हा सोहळा अगदी पाहण्यासारखा असतो. हा सोहळा पाहण्यासाठी लोक नेहमी मोठ्या संख्येने  येतात.

अधिक वाचा: Google Doodle: Google कडूनही 15 ऑगस्ट साजरा, सर्च इंजिन दिसलं रंगीबेरंगी रंगात; स्पेशल Doodle

बीटिंग रिट्रीट समारंभाच्या आधी अटारी-वाघा सीमेवर प्रचंड गर्दी झाली होती. इथे लोकं देशभक्तीपर गाणी गात होते तर काही जण नृत्य देखील करत होते. तसेच येथे भारतीय राष्ट्रध्वजही फडकवण्यात आला होता. बीटिंग रिट्रीट ही एक प्रतिष्ठित परंपरा आहे ज्यामध्ये दोन्ही देशांचे राष्ट्रध्वज संध्याकाळपूर्वी एकाच वेळी खाली उतरवले जातात.

अटारी बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट सोहळ्याचा इतिहास

बीटिंग द रिट्रीट सेरेमनी म्हणजे काय?

ही परंपरा सैन्याच्या बॅरेक्समध्ये परत येण्याचे प्रतिक म्हणून पार पाडली जाते. बीटिंग द रिट्रीट सोहळा जगभरात होतो. युद्धानंतर सैन्य बॅरेकमध्ये परत येतं. सैन्य परतल्यावर संगीतमय सोहळा होतो. या कार्यक्रमाला बीटिंग द रिट्रीट सेरेमनी म्हणतात. भारतामध्ये 1950 पासून बीटिंग द रिट्रीटची परंपरा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी