Covaxin: कोविशिल्ड नंतर आता भारत बायोटेकच्या स्वदेशी 'कोव्हॅक्सिन' लसीला भारतात मान्यता

Bharat Biotech's Covaxin: सीडीएससीओच्या कमिटीने भारत बायोटेकच्या कोविड-१९ कोव्हॅक्सिन (Covaxin)ला भारतात आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. 

Bharat Biotechs indigenously developed COVID-19 vaccine Covaxin gets approval for emergency use by expert panel
प्रातिनिधीक फोटो 
थोडं पण कामाचं
  • कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापराला मान्यता दिल्याची सूत्रांची माहिती
  • ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीला मान्यता मिळाल्यावर आता कोव्हॅक्सिनला मंजुरी

नवी दिल्ली : भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोविड-१९ कोव्हॅक्सिन (Covaxin)लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची शिफारस सीडीएससीओ (CDSCO) म्हणजेच सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या कमिटीने केली आहे. भारतात कोरोनावरील ही दुसरी लस आहे ज्याच्या आपत्कालीन वापराला सीडीएससीओच्या एक्सपर्ट्स कमिटीने मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी शुक्रवारी (१ जानेवारी २०२१) सीडीएससीओच्या एक्सपर्ट पॅनलने ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या कोविशिल्ड (Oxford AstraZeneca Covishield) लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. मात्र, असे असले तरी लसीला भारतात उपयोगासाठी आणण्याबाबतचा अंतिम निर्णय डीसीजीआय म्हणजेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) घेणार आहे.

सेंट्र्ल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या एक्सपर्ट कमिटीने आपत्कालीन उपयोगासाठी ऑक्सफर्डच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला परवानगी दिल्यानंतर आता डीसीजीआयकडे पाठवण्यात येणार आहे. डीसीजीआय म्हणजेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया या लसींना आपत्कालीन उपयोगासाठी परवानगी देईल. डीसीजीआयची परवानगी मिळताच भारतात या लसींच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल.

पंतप्रधान मोदींनी भारत बायोटेकच्या लस निर्मिती केंद्राला दिली होती भेट 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर महिन्यात हैदराबादच्या भारत बायोटेक या लस सुविधा केंद्राला भेट दिली होती. भारत बायोटेकमध्ये कोविड-१९ विरोधी स्वदेशी लस निर्मितीच्या प्रगतीविषयीची माहिती त्यावेळी पंतप्रधानांनी घेतली. भारत बायोटेक (Bharat Biotech) आयसीएमआर (ICMR) आणि एनआयव्ही (National Institute of Virology) संयुक्तपणे कोव्हॅक्सिन लसीची (Covaxin vaccine) निर्मिती करत आहेत. भारत बायोटेकने नोव्हेंबरच्या मध्यात कोव्हॅक्सिन लचीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी