ज्ञानवापी : शिवलिंग १३व्या शतकातले तर मशिद १७व्या शतकातली - सूत्र

Big news on Gyanvapi: 'Shivling' is of 13th century, the dome of the mosque was built in the 17th century- sources : सत्य हीच मोठी शक्ती आहे हे सत्य भारत अनेक शतकांपासून जाणतो. यामुळेच मुंडक उपनिषदात उल्लेख आहे 'सत्यमेव जयते'. अशोक स्तंभावर पण कोरले आहे 'सत्यमेव जयते'.

Big news on Gyanvapi: 'Shivling' is of 13th century, the dome of the mosque was built in the 17th century- sources
ज्ञानवापी : शिवलिंग १३व्या शतकातले तर मशिद १७व्या शतकातली - सूत्र 
थोडं पण कामाचं
  • ज्ञानवापी : शिवलिंग १३व्या शतकातले तर मशिद १७व्या शतकातली - सूत्र
  • ज्ञानवापी संदर्भात हिंदू पक्षाची लढाई ३५३ वर्षांपासून सुरू आहे
  • १९९१च्या प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्टमध्ये धार्मिकस्थळाचे स्वरुप जाणून घेण्यास प्रतिबंध केलेला नाही

Big news on Gyanvapi: 'Shivling' is of 13th century, the dome of the mosque was built in the 17th century- sources : सत्य हीच मोठी शक्ती आहे हे सत्य भारत अनेक शतकांपासून जाणतो. यामुळेच मुंडक उपनिषदात उल्लेख आहे 'सत्यमेव जयते'. अशोक स्तंभावर पण कोरले आहे 'सत्यमेव जयते'.

ज्ञानवापी संदर्भात हिंदू पक्षाची लढाई ३५३ वर्षांपासून सुरू आहे. हिंदू पक्षाचे म्हणणे आहे की तो सत्यासोबत उभा आहे. याच कारणामुळे हिंदू पक्ष आजही लढत आहे. औरंगजेबाच्या कारवाया सत्य दाबून टाकू शकत नाही. सत्याला कोणता कायदाही थोपवू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने १९९१च्या प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट अर्थात प्रार्थनास्थळ कायद्याच्या निमित्ताने ज्ञानवापीचा सर्व्हे थोपविण्याचे प्रयत्न आज हाणून पाडले. आता 'सवाल पब्लिक का' हाच आहे की, ज्ञानवापीच्या सत्यावर कायद्याचा शिक्का उमटणार आहे का?...

ज्ञानवापी शिवलिंग संदर्भात मोठी बातमी आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तज्ज्ञांनी कार्बन डेटिंग केले आहे. कार्बन डेटिंग या तंत्राद्वारे एखादी वस्तू कोणत्या काळातील आहे हे तपासले जाते. या प्रयोगातून स्पष्ट झाले आहे की, शिवलिंग १३व्या शतकातले तर मशिद १७व्या शतकातली आहे. दोन्हीच्या निर्मितीत ४०० वर्षांपेक्षा जास्त काळाचे अंतर आहे.

ज्ञानवापी सर्व्हे विरोधात मुस्लिम पक्ष सर्वोच्च न्यायालयात गेला. मुस्लिम पक्षाने १९९१च्या प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्टचा आधार घेऊन सर्व्हे थोपविण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम पक्षाचे वकील हुजेफा अहमदी म्हणाले, कमिशन कशासाठी तयार केले? फक्त हे जाणून घेण्यासाठी की तिथे देवता आहे? सर्व्हे कायद्याच्या सेक्शन ३ चे उल्लंघन करतो. या युक्तीवादानंतर जस्टिस डी. वाय. चंद्रचूड यांनी १९९१च्या प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्टची कॉपी मागवून घेतली. ही कॉपी बघितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाचा युक्तीवाद फेटाळला. १९९१च्या कायद्यानुसार सर्व्हे फेटाळता येणार नाही, असे चंद्रचूड म्हणाले. १९९१च्या कायद्यात धार्मिकस्थळाचे स्वरुप जाणून घेण्यास प्रतिबंध केलेला नाही, असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने वाराणसी कोर्टात सुरू असलेला खटला वाराणसी जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेशा यांच्या न्यायालयात वर्ग केला. वजू स्थळ सील करण्याचा १७ मे २०२२ चा आदेश रद्द केला नाही. वाराणसी कोर्टातील सुनावणी रद्द केली नाही ती न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेशा यांच्या न्यायालयात वर्ग केली. 

मुस्लिम पक्ष जाणून घेतला तसा हिंदू पक्षही जाणून घेऊ. हिंदू पक्षाने सर्वोच्च न्यायालयात लीव्ह पीटिशन दाखल केली आहे. याची कॉपी 'टाइम्स नाउ नवभारत'कडे आहे. यातील ३१व्या पानावरील ६०व्या पॉइंटनुसार हिंदू पक्ष म्हणतो, 5 कोस स्थान येथे आदि विश्वेश्वर ज्योतिर्लिंग याची पूजा अनंतकाळापासून सुरू आहे. याच पानावरील पॉइंट ६१ सांगतो मंदिराचा एखादा भाग तोडण्यात आला तरी पूजास्थळाचे धार्मिक स्वरुप बदलत नाही. पॉइंट ६२ सांगतो, मंदिराचा वरील भाग तोडण्यात आला तरी इतर स्थळांवर पूजा सुरू आहे.

पॉइंट ६३ सांगतो, १९३६ च्या सुनावणीतच हे सिद्ध झाले की 'सनातन'चे धार्मिक स्वरुप अस्तित्वात आहे. पान ३६ वरील पॉइंट ७४ सांगतो मशिद फक्त वक्फच्या संपत्तीवर बनू शकते. वक्फ स्थापन करण्याचा अधिकार आहे त्याला ज्याचा संपत्तीवर अधिकार आहे. औरंगजेबाने या ठिकाणी वक्फ स्थापन केलेले नाही. याच पानावरील पॉइंट ७३ सांगतो हिंदू कायद्यानुसार पूजास्थळाचा मालक देव आहे. पूजास्थळावर जबरदस्तीने ताबा घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. 

मुस्लिम पक्षाला हिंदू पक्षाचे हे मुद्दे फेटाळणे आव्हानात्मक ठरणार आहे. कोर्टात मुस्लिम पक्ष काय करणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. सध्या तरी शक्तिप्रदर्शन सुरू आहे. ज्ञानवापीचा सर्व्हे सुरू झाला त्यावेळी ६ मे रोजी शुक्रवारच्या 'जुमे की नमाज'ला गर्दी झाली होती. आता न्यायालयीन सुनावणी सुरू असताना पुन्हा 'जुमे की नमाज'ला गर्दी झाली. गर्दी एवढी झाली की काही जणांना घरी जा असे सांगावे लागले. या सगळ्या घडामोडींमध्ये पब्लिक काय करत आहे...

सवाल पब्लिक का

१९९१च्या प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट अर्थात प्रार्थनास्थळ कायद्याचा आधार घेऊ पाहणाऱ्याला मुस्लिम पक्षाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे का?

5 कोस परिसराचे धार्मिक स्वरुप सनातन आहे का?

ज्ञानवापीतील समोर आलेल्या पुराव्यांमुळेच मंदिर सिद्ध होणार आहे का?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी