Deepak Kumar : बिश्नोई गँगचा टीनू चौथ्यांना पोलिसांच्या ताब्यातून पळाला, मूसेवाला हत्येप्रकरणी होणार होती चौकशी

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 02, 2022 | 16:24 IST

Deepak Kumar :  गॅंगस्टर दीपक कुमार उर्फ टीनू शनिवारी रात्री चौथ्यांदा पोलिसांच्या ताब्न्यातून पळून गेला आहे. टिनू लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा सदस्य होता .सिद्धू मूसेवाला हत्ये प्रकरणी त्याची चौकशी होणार होती. टीनोला कपूरथला तुरुंगात कैद करण्यात आले होते, परंतु तो पळून गेला आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. टीनूच्या पळून जाण्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

थोडं पण कामाचं
  • गॅंगस्टर दीपक कुमार उर्फ टीनू शनिवारी रात्री चौथ्यांदा पोलिसांच्या ताब्न्यातून पळून गेला आहे.
  • टिनू लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा सदस्य होता.
  • सिद्धू मूसेवाला हत्ये प्रकरणी त्याची चौकशी होणार होती.

Deepak Kumar : नवी दिल्ली : गॅंगस्टर दीपक कुमार उर्फ टीनू शनिवारी रात्री चौथ्यांदा पोलिसांच्या ताब्न्यातून पळून गेला आहे. टिनू लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा सदस्य होता .सिद्धू मूसेवाला हत्ये प्रकरणी त्याची चौकशी होणार होती. टीनोला कपूरथला तुरुंगात कैद करण्यात आले होते, परंतु तो पळून गेला आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. टीनूच्या पळून जाण्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आप सरकार मूसेवालाच्या मारेकर्‍यांना पाठीशी घालत आहे असा आरोप भाजपने केला आहे. (bisnhoi gang member deepak kumar aka tinu absconded from police custody in punjab)

अधिक वाचा :  Shashi Tharoor : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गांधी कुटुंब तटस्थ, खासदार शशी थरूर यांची माहिती

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस एका खासगी गाडीतून त्याला मानसा येथे नेले जात होते. तेव्हा मोठ्या शिताफीने टीनूने पोलिसांच्या तावडीतून पळ काढला. शनिवारी रात्री ११ च्या सुमारास टीनू पोलिसांच्या ताब्यातून निसटला. २०१७ पासून तो तुरुंगात होता आणि तुरुंगातूनच तो बिश्नोई गँगचे काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टीनूकडून सिद्धू मूसेवालाच्या खुनाबाबत चौकशी करायची होती. परंतु या दरम्यान टीनून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. 

अधिक वाचा : Nanded Bank robbery : नांदेडमध्ये धारदार तलवारी दाखवत पथसंस्थेत दरोडा, पहा व्हिडीओ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी