[VIDEO]: भाजप आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, तिघांचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 07, 2019 | 22:55 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

BJP MLA's SUV rams motorcycle: भाजपच्या आमदाराच्या एसयूव्ही कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

bjp mla rahul lodhi nephew uma bharti suv car rams motorcycle tikamgarh madhya pradesh india news
[VIDEO]: भाजप आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, तिघांचा मृत्यू 

थोडं पण कामाचं

  • भाजप आमदाराच्या कारची दुचाकीला धडक
  • अपघातात दोघांचा घटनास्थळी तर एकाचा रुग्णालयात मृत्यू
  • भाजप आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल

टिकमगढ: भारतीय जनता पक्षाच्या भरधाव एसयूव्ही कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी मध्यप्रदेशतील टिकमगढ-छतरपूर मार्गावर पपावनी येथे हा अपघात घडला आहे. भाजप आमदार राहुल सिंह लोधी यांच्या भरधाव एसयूव्हीने दुकाचीला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टिकमगढ जिल्ह्यात हा अपघात घडला आहे. भरधाव एसयूव्हीने दुचाकीला धडक दिली या अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एका जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत झाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, एसयूव्ही कार चालक हा वेगात होता आणि त्याने दुचाकीला धडक दिली. घटनेवेळी आमदार राहुल लोधी हेच ड्राईव्ह करत असल्याचं बोललं जात आहे.

आमदार राहुल सिंह लोधी हे मध्यप्रदेशातील टिकमगढ जिल्ह्यातील खरगापुर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. तसेच आमदार राहुल लोधी हे मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचे पुतणे आहेत. अपघात घडला त्यावेळी भाजप आमदार राहुल सिंह लोधी हे कारमध्ये होते की नाही या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. दरम्यान, आमदार राहुल सिंह लोधी यांनी दावा केलाय की, ही अपघात त्यांच्या एसयूव्हीने झालेला नाहीये. 

टिकमगढ जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अनुराग सुजानिया यांनी सांगितले की, बृजेंद्र अहिरवार (२५ वर्षे), रवी अहिरवार (२३ वर्षे) आणि मदन अशी मृतकांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी भाजप आमदार राहुल सिंह लोधी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे.

दरम्यान, आमदार राहुल लोधी यांनी दावा केला आहे की, हा अपघात माझ्या एसयूव्ही कारने झालेला नाहीये. ज्यावेळी हा अपघात घडला त्यावेळी मी घटनास्थळापासून २० किलोमीटर दूर आपल्य विधानसभा क्षेत्रातील फुटेर गावात उपस्थित होतो. माझा कार चालक मला घेण्यासाठी फुटेर गावाकडे येत होता त्यावेळी तेथून जात असताना अपघात झाल्याचं त्याने पाहिलं. त्यानंतर माझ्या कार चालकानेच या अपघाताची माहिती पोलिसांना दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी