भाजप खासदार बाबुल सुप्रियो तृणमूल काँग्रेसमध्ये!

भाजपचे आसनसोल मतदारसंघाचे खासदार आणि केंद्र सरकारमधील माजी मंत्री बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मंत्रीपद गमावल्यापासून बाबुल सुप्रियो भाजपवर नाराज होते.

BJP Sitting MP Babul Supriyo joins the Mamata Banerjee's TMC in Kolkata
भाजप खासदार बाबुल सुप्रियो तृणमूल काँग्रेसमध्ये! 

थोडं पण कामाचं

  • भाजप खासदार बाबुल सुप्रियो तृणमूल काँग्रेसमध्ये!
  • मंत्रीपद गमावल्यापासून बाबुल सुप्रियो भाजपवर नाराज होते
  • भाजपच्या खासदार पदाचा राजीनामा देऊन बाबुल सुप्रियो तृणमूल काँग्रेसच्या कोट्यातून राज्यसभेवर जाण्याच्या तयारीत

कोलकाता: भाजपचे आसनसोल मतदारसंघाचे खासदार आणि केंद्र सरकारमधील माजी मंत्री बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मंत्रीपद गमावल्यापासून बाबुल सुप्रियो भाजपवर नाराज होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्वीट करुन लवकरच भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेणार असल्याचे जाहीर केले होते. आता त्यांच्या पक्षांतराचे वृत्त आले आहे.  BJP Sitting MP Babul Supriyo joins the Mamata Banerjee's TMC in Kolkata

भाजपच्या खासदार पदाचा राजीनामा देऊन बाबुल सुप्रियो तृणमूल काँग्रेसच्या कोट्यातून राज्यसभेवर जाण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आहे. राज्यसभेत तृणमूलची एक जागा रिक्त आहे. याच जागेवरुन पुन्हा खासदार होण्यासाठी बाबुल सुप्रियो उत्सुक असल्याची चर्चा आहे. 

लोकसभेच्या निवडणुकीत बाबुल सुप्रियो यांनी तृणमूलच्या मुनमुन सेन यांचा पराभव केला होता. पण पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित कामगिरी त्यांच्याकडून झाली नाही. यानंतर केंद्र सरकारमधील मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा आदेश त्यांना देण्यात आला. आदेशाचे पालन करुन मंत्रीपदाचा राजीनामा दिला तरी बाबुल सुप्रियो नाराज झाले होते. त्यांनी राजकारणातून संन्यास घेणार असल्याचे सूतोवाच केले. कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही, असेही ते म्हणाले होते. प्रत्यक्षात बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ममता बॅनर्जीं यांचे नातलग आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी