तुर्कस्तानची राजधानी इस्तंबुलमध्ये बॉम्बस्फोट

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 13, 2022 | 23:36 IST

Blast At Busy Street In Turkey Istanbul : तुर्कस्तानची राजधानी इस्तंबुलमध्ये एका गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. टाकिझम चौकाजवळ (Taksim Square) असलेल्या  इस्तिकाल मार्ग (Istiklal Street) येथे बॉम्बस्फोट झाला.

थोडं पण कामाचं
  • तुर्कस्तानची राजधानी इस्तंबुलमध्ये बॉम्बस्फोट
  • बॉम्बस्फोटात 6 जण ठार आणि 80 जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त
  • जखमी आणि मृतांच्या आकडेवारीत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे

Blast At Busy Street In Turkey Istanbul : तुर्कस्तानची राजधानी इस्तंबुलमध्ये एका गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. टाकिझम चौकाजवळ (Taksim Square) असलेल्या  इस्तिकाल मार्ग (Istiklal Street) येथे बॉम्बस्फोट झाला. बॉम्बस्फोटात 6 जण ठार आणि 80 जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. जखमी आणि मृतांच्या आकडेवारीत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.

बॉम्बस्फोटाशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. घटनास्थळी पोलीस आणि वैद्यकीय पथके पोहोचली आहेत. मदतकार्य सुरू आहे. बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही.

प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: विद्यार्थ्याला नग्न करून मारहाण

Rajnath Singh म्हणाले, अखंड भारताचे पहिले पंतप्रधान सुभाषचंद्र बोस; चर्चेला उधाण

ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला त्या ठिकाणाला पोलिसांनी घेराव घातला आहे. बॉम्बस्फोट प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 4.20 वाजता (13.30 GMT) बॉम्बस्फोट झाला. स्फोटाच्या दणक्याने परिसर हादरला. रस्त्यावर काचांचा खच पडला. मृत आणि जखमी यांच्यामुळे परिसरात दहशत पसरली. गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी